Maharashtra Floor test Live : विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण ठरले 'लेटलतिफ'

सभागृहाचे दार बंद झाल्याने त्यांना बहुमत चाचणीस सभागृहात उपस्थित राहता आले नाही.
Maharashtra Floor test Live Updates, Maharashtra Session news updates, Ashok Chavan News
Maharashtra Floor test Live Updates, Maharashtra Session news updates, Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे माजी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, व कॉग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे वेळेत विधानभवनात पोहचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना बहुमत चाचणी उपस्थित राहता आले नाही. ते शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीस मुकले. हे दोन्ही आमदार उशीरा आले. सभागृहाचे दार बंद झाल्याने त्यांना बहुमत चाचणीस सभागृहात उपस्थित राहता आले नाही.(Maharashtra Floor test Live Updates)

आज विधानसभेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. बहुमत चाचणीस प्रारंभ झाला आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर मतविभागाची मागणी करण्यात आली. मतदानास सुरवात होत आहे. विधानसभेच्या कामकाजास सुरुवात झाली आहे.

शिंदे गटाने जारी केलेल्या व्हीपविरोधात शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विधानसभा अध्यक्षांना या व्हीपला मान्यता देण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. मात्र, 11 जुलैच्या सुनावणीतच यावर निर्णय होईल, असे न्यायालय म्हणाले. त्यामुळे व्हीपबाबत शिवसेनेला दिलासा मिळू शकला नाही.

Maharashtra Floor test Live Updates, Maharashtra Session news updates, Ashok Chavan News
शिंदे-भाजपची बहुमत चाचणी: मुनगंटीवारांनी मांडला विश्वासदर्शक प्रस्ताव

संतोष बांगर यांनी कालच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपली बाजू बदलली आहे. दुसरीकडे, बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेकडूनही प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे व्हीपवरुन आजही शिंदे गट व शिवसेनेमध्ये संघर्ष पाहण्यास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com