Sanket Bawankule Video : बावनकुळेंच्या मुलाने बीफ खाल्ल्याचा राऊतांचा आरोप, शिंदे गटाकडून पाठराखण

Sanket Bawankule Nagpur Hit and Run Case : संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं, त्या हॉटेलच्या बिल मध्ये बीफचा समावेश असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut,  Sanket Bawankule, Sanjay Shirsat
Sanjay Raut, Sanket Bawankule, Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Hit and Run Case : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाने तर या प्रकरणाच्या खोलात जात अद्याप संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? असा जाब विचारला आहे. शिवाय गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

तर संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं, त्या हॉटेलच्या बिल मध्ये बीफचा समावेश असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाने मात्र आता बावनकुळेंच्या मुलाची पाठराखण केली आहे. कारण राऊतांच्या वक्तव्यावर शिदें गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टीका केली आहे.

संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, "तो हॉटेलमध्ये काय खात होता आणि काय नाही हे त्यांना काय करायचं आहे. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्या हॉटेलमध्ये काय होतं? त्यांच्या प्लेटमध्ये काय होतं?

Sanjay Raut,  Sanket Bawankule, Sanjay Shirsat
Sanket Bawankule : संकेत बावनकुळेची ऑडीकार चालवणाऱ्या अर्जुनचे काँग्रेसशी 'कनेक्शन'

अहो त्यांनी कोणती चड्डी घातली हे पाहायला देखील तुम्ही कमी करणार नाही. यांना आपण कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे." अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची पाठराखण करायला शिंदे गटाचे नेते सरसावल्याचं पाहायला मिळत आहे.

Sanjay Raut,  Sanket Bawankule, Sanjay Shirsat
Nagpur Hit and Run Case: संकेत बावनकुळेलाही निंबध लिहायला सांगून सोडणार का? ठाकरे गटाच्या नेत्या कडाडल्या

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नागपूर 'ऑडी'कार अपघात प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "ऑडी कारमध्ये लाहोरी बारचे बिल मिळालं आहे. ते लाहोरी बारमधील बिल जनतेसमोर आणलं पाहिजे. त्या बिलात दारूचा समावेश आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवतात मात्र, चिकन, मटन आणि बीफ कटलेत याचाही बिल मध्ये समावेश आहे. श्रावण आहे, गणपती आहे, हिंदुत्व आहे. असं सांगायचं आणि बीफ खाऊन लोकांचे रस्त्यावर बळी घ्यायचे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com