Mumbai News : धर्मवीर चित्रपटाच्या निर्मितीवेळी काही सीन बदलण्यात आले होते. मात्र, या वेळी कोणाला आवडो न आवडो कोणताही सीन बदलणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. तसेच धर्मवीर या चित्रपटात मी नगरविकास मंत्री होतो. मात्र, 'धर्मवीर 2' मध्ये मी मुख्यमंत्री असेल, असे विधान शिंदे यांनी केले.
धर्मवीर चित्रपटाच्या यशानंतर आता 'धर्मवीर 2' या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या शूटिंगचा मुहूर्त सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी ठाकरे यांना चिमटे काढले. या वेळी आनंद दिघेंची भूमिका साकारणारे प्रसाद ओक, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, एकनाथ शिंदेंची भूमिका करणारे क्षितिज दाते आदी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिंदे म्हणाले “धर्मवीर चित्रपटला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या चित्रपटात दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवण्यात आले. मात्र, दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की, एका सिनेमात ते मावणार नाही. त्यामुळे हा दुसरा चित्रपट तयार करण्यात येत आहे. पहिल्या भागात मी नगरविकासमंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री झालेलो आहे. यात दिघे साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असंही शिंदे म्हणाले.
(Edited by Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.