सातारा : राज्यात सत्तात्तर होत असताना मंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, याची चर्चा होत आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या (bjp) हालचाली जोरात सूरु झाल्या आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या साथीने ते सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. (Shivendraraje Bhosale latest news)
भाजपकडून सातारा जिल्ह्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांची सहकारमंत्रीपदी (कॅबिनेट) वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातारा जिल्ह्यात भाजपकडून जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवेंद्रराजे यांनी मंत्रीपद देऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शिवेंद्रराजे यांच्याकडून सुरुंग लावण्याची भाजपने तयारी सुरु केली असल्याचे समजते.
शिंदे गटासोबत गेलेले अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना आरोग्य राज्यमंत्रीपदी लॉटरी लागणार असे बोलले जात आहेत. डॉ. बालाजी किणीकर हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. एक मागासवर्गीय चेहरा म्हणून किणीकर यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट आहे. यामध्ये दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) मंत्री होतील का? याची उत्सुकता आहे. मंत्रिपदासाठीची रस्सीखेच पुढच्या काळात पाहायला मिळेल. बंडखोरांसह भाजपमधील काही आमदारांचीही वर्णी मंत्रिपदासाठी लागेल,अशी चर्चा आहे.
दादा भुसे कॅबिनेट दर्जाचे मंत्री नव्या सरकारमध्येही असतील.दादा भुसे सुरवातीपासून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, तर नांदगाव-मनमाड मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे राज्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.