Shivsena: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच खिंडार ; दोन शाखाप्रमुखांचा राजीनामा

प्रकाश पुजारी (Prakash Pujari)आणि कौस्तुभ महामुणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
Uddhav Thackeray News, Prakash Pujari News, Shivsena News
Uddhav Thackeray News, Prakash Pujari News, Shivsena Newssarkarnama

मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) ४० आमदारांच्या बंडानंतर राज्यात शिंदे सरकार (Eknath Shinde) स्थापन झाले. त्यानंतरही शिवसेनेत पडझड सुरुच आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. संघटनेत फूट पडू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. (Shiv Sena latest Marathi news)

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेत खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. अशातच आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच हादरे बसू लागले आहेत. मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

शाखा क्रमांक 3 चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी (Prakash Pujari)आणि शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.आमदारांची बंडखोरी होऊनही आतापर्यंत मुंबईत एकाही शाखाप्रमुखाने उघडपणे राजीनामा दिला नव्हता. या दोन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिल्याने राजीनामा सत्र सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Prakash Pujari News)

Uddhav Thackeray News, Prakash Pujari News, Shivsena News
हे कारण पटणारे आहे का ? ; अशोक चव्हाणांना हायकमांडचा सवाल, बहुमत चाचणीस 'दांडी'

शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना पुजारी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रकाश पुजारी यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत आहेत. परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहे. मी याकारणाने माझ्या शाखा प्रमुखपदाचा राजीनामा आपणाकडे सुपुर्त करीत आहे,”

ठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. सुर्वे आज (बुधवारी) सायंकाळी आपल्या मतदारसंघात परतत असून सायंकाळी आपल्या समर्थकांची भेट घेणार आहेत.सु्र्वें यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश पुजारी यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यात अजून पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे समजते.

शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com