Thane Muncipal : ठाणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर भाजपचे बोट, तीन वर्षांच्या हिशोबाची केली मागणी

Mrunal Pendse BJP : सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रशासनाच्या चुकीच्या कामांवर अंकुश ठेवला जाईल अशी स्पष्ट भुमिका भाजपने घेतली.
Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : ठाणे महापालिकेवर मागील अडीच ते तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरु होती. या कालावधीत पालिकेला राज्य शासनाकडून हजारी कोटींचा विकास निधी प्राप्त झाला आहे. त्यातच आता सत्तेत सहभागी झालेल्या भाजपने, मागील तीन वर्षात पालिकेत झालेल्या झालेली विकास कामे, त्यांच्यावर करण्यात आलेल्या खर्चाचा, प्राप्त निधी आदींची माहिती भाजपच्या मृणाल पेंडसे यांनी होणाऱ्या पहिल्याच महासभेत विचारला आहे.

ठाणे पालिकेची नुकतीच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. अशातच यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपने मागील वर्षीच्या तुलनेत अधिकच्या जागा जिंकल्या आहे. तर, सुरुवातीला विरोधी पक्षात बसण्याची भूमिका भाजपने घेतली होती. त्यानंतर भाजप सत्तेत सहभागी झाला.

सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रशासनाच्या चुकीच्या कामांवर अंकुश ठेवला जाईल अशी स्पष्ट भुमिका भाजपने घेतली. आता भाजपने पहिल्याच महासभेत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. यात काही प्रश्न हे पालिका प्रशासनाला अडचणीत आणणारे ठरणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, २०२३ ते २०२५ या कालावधीत राज्य शासनाकडून ठाणे महानगरपालिका यांना विविध खात्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र हा निधी नेमका कोणत्या विकासकामांसाठी वापरण्यात आला, कोणत्या खात्यामार्फत तो वितरित झाला, याची सुस्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. या निधीतून झालेल्या कामांची टेंडर प्रक्रिया महापालिकेमार्फत राबविण्यात आली का? हा निधी कोणत्या प्रभागांमध्ये खर्च करण्यात आला आणि त्या कामांची सद्यस्थिती काय आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि चौकांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर नियमित कारवाई होते का?, मागील एका महिन्यात प्रभागनिहाय किती कारवाया करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.

Thane Municipal Corporation
Ganesh Naik vs Eknath Shinde : नाईक विरुद्ध शिंदे वादात निलेश राणेंची उडी, वनमंत्री काय कामाचे? म्हणत खात्याच्या कारभाराची कुंडलीच मांडली

स्थायी समितीच्या किती बैठका

गेल्या तीन वर्षांत स्थायी समितीच्या किती बैठका झाल्या, त्या बैठकींमध्ये किती निर्णय घेण्यात आले आणि किती कामांना मंजुरी देण्यात आली, याची तपशीलवार माहिती, मंजूर झालेल्या कामांच्या विषयपत्रिका, ठरावांच्या प्रती, निविदा प्रसिद्ध झाल्या का, वर्क आॅर्डर देण्यात आल्या का आदी प्रश्नचिन्ह नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केले आहे.

प्रश्न दडपले जाणार?

मृणाल पेंडसे म्हणाल्या,महापालिका प्रशासन या प्रश्नांना ठोस आणि वेळेत उत्तर देणार का फाईलींच्या ढिगाऱ्यात हे प्रश्न दडपले जाणार,  पण प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा लाभ दिसतो का? याची माहिती घ्यायची आहे.

Thane Municipal Corporation
Shiv Sena UBT vs Eknath Shinde : मुंबईचा सौंदर्यभंग की सत्तेचा दुरुपयोग? उपमुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का? ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट 'BMC'ला सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com