Kunar Hembram News : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदाराचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 : कुणार हेमब्रम यांनी तिकीट नाकारल्याने भाजपला रामराम ठोकत असल्याची घोषणा मार्च महिन्यात केली होती. मात्र, त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत जाहीर केले नव्हते.
Kunar Hembram Joins TMC
Kunar Hembram Joins TMCSarkarnama

West Bengal News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत असतानाच पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का बसला आहे. खासदार कुणार हेमब्रम (Kunar Hembram News) यांनी रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाची ताकद वाढली आहे. राज्यात भाजप विरुध्द तृणमूल काँग्रेस अशी थेट लढत होत आहे.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या उपस्थितीत हेमब्रम यांचा पक्षप्रवेश झाला. हेमब्रम यांना निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी मार्च महिन्यातच भाजपमधून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी कोणत्या पक्षात जाणार, याबाबत जाहीर केले नव्हते.(Lok Sabha Election 2024)

Kunar Hembram Joins TMC
Navneet Rana News : 'केजरीवालांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?' ; नवनीत राणांचे टीकास्त्र!

हेमब्रम यांच्या पक्षप्रवेशाबाबत टीएमसीने म्हटले आहे की, ‘बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभा घेत असताना भाजपमधून बाहेर पडलेले खासदार कुणार हेमब्रम यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थित तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.’ तर हेमब्रम यांच्या जाण्यामुळे पक्षाला कसलेही नुकसान होणार नाही, असे भाजपने (BJP) म्हटले आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, हेमब्रम यांच्या जाण्यामुळे काही फरक पडणार नाही. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांचे आम्ही स्वागत करतो. केवळ तिकीटासाठी येणाऱ्या लोकांचे नाही. कोणाला उमेदवारी द्यायची, हा आमचा पक्ष निर्णय घेतो.

हेमब्रम हे बंगालमधील झारग्राम मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी मार्च महिन्यातच भाजपमधील बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने या मतदारसंघातून प्रणाथ तुडू यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे तृणमूलची ताकद वाढली आहे.

Kunar Hembram Joins TMC
Bharat Sevashram Sangh : ममतांनी प्रचारात काढला BSS चा मुद्दा; पंतप्रधान मोदी म्हणाले, धमकी दिली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com