Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी,'डंके की चोट' पर सदावर्तेंना धक्का; ST बँकेतील 12 संचालक फोडले?

Eknath Shinde On Gunratna Sadavarte : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अत्यंत जवळचे मानले गेलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या ताब्यातील स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे 12 संचालक फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठा गळ टाकला आहे.
Eknath Shinde Gunratna Sadavarte  (1).jpg
Eknath Shinde Gunratna Sadavarte (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनाचं नेतृत्व करत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तापवलं होतं. यानंतर वकिली करता करता त्यांनी एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलही उतरवलं. सदावर्तेंच्या पॅनलनं एसटी बँकेची संचालक मंडळाच्या निवडणुकीतही विजय मिळवला होता. यानंतर बँकेतील त्यांच्या मनमानी कारभारावरुन गंभीर आरोपही झाले. पण आता याच एसटी बँकेतून सदावर्तेंना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे.

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या ताब्यात असलेल्या एसटी बँकेच्या संचालकांनी मंगळवारी (ता.17) ऑपरेशन टायगरचे नेतृत्व करणाऱ्या मंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली. लवकरच हे सर्व संचालक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.

माजी खासदार आणि शिवसेनेचे मुत्सद्दी नेते आनंदराव अडसूळ यांनी टाकलेल्या डावामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी बँकेतील साम्राज्यालाच येत्या काही दिवसांत सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून एसटी बँकेतील सदावर्ते यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या भेटीमुळे हे एसटी बँकेचे संबंधित संचालक गुणरत्न सदावर्ते यांची साथ सोडण्याच्या निर्णय आता पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील या बैठकीत या संचालकांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अत्यंत जवळचे मानले गेलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या ताब्यातील स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे 12 संचालक फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने (Eknath Shinde Shivsena) मोठा गळ टाकला आहे. याद्वारे शिवसेनेकडून सदावर्तेंसोबतच भाजपलाही धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 संचालकांचा ठाण्यात शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

एसटी कामगारांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची बँक असलेल्या एसटी कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोपही करण्यात येतो.तसेच अॅड. सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका देतानाच एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली होती.

कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटी बँकेच्या गैरकारभाराबाबत 4 ऑक्टोबर 2023 रोजी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.तसेच यवतमाळमधील सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.

शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यावेळी त्यांनी सदावर्तेंचे मेहुणे सौरभ पाटील यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्यापासून बँकेचा व्यवहार तोट्यात आल्याचं म्हटलं होतं.

तसेच सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनमानी निर्णयांमध्ये सभासदांनी 180 कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्याचा खळबळजनक दावाही केला होता.त्यामुळे सदावर्ते व त्यांच्या पत्नीला बँकेच्या तांत्रिक मंडळावरून काढून टाकण्यात यावे,अशी मागणीही परब यांनी उचलून धरली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com