Mahayuti Government: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या 'या' लाडक्या आमदाराची मंत्रिमंडळात एन्ट्री होणार?

Eknath Shinde Shivsena : सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असून वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारानं मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.
Mahayuti government
Mahayuti governmentSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : आमदार निवासातील बनियन टॉवेलवरती कॅन्टिन चालकाला केलेली मारहाण,विधानसभेच्या लॉबीतील आव्हाड-पडळकर समर्थकांमधील हाणामारी,कृषिमंत्र्यांचा रम्मी खेळतानाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ,एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं यामुळे महायुती सरकार चांगलेच बॅकफूटवर गेले आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असून वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेतील एका आमदारानं मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शुक्रवारी (ता.25) मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी यावेळी आपल्याला आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून काम करण्यास आवडेल, असं म्हटलं आहे.

बांगर म्हणाले,छोटा कार्यकर्ता असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कोणते फेरबदल होणार आहेत, याची मला माहिती नाही. पण, जर पक्षानं जबाबदारी दिली तर मंत्रिपद कुणाला नको असतं, मीही एक आमदार म्हणून काम करतोय. आमदार कशा पद्धतीनं काम करतोय हे तुम्ही दाखवता. परंतु, मंत्री झाल्यानंतर मंत्री कसा असावा हे महाराष्ट्रातील जनतेला आम्ही दाखवून देऊ,असंही आमदार संतोष बांगरांनी (Santosh Bangar) सांगितलं.

Mahayuti government
Santosh Bangar: एकाकी पडलेल्या कोकाटेंसाठी शिंदेंचा पठ्ठ्या धावला,संतोष बांगरांचा मोठा दावा; म्हणाले,'त्या' व्हिडिओशी छेडछाड...

यावेळी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. आपल्याला जर जर मंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर आरोग्य विभागाचं काम करण्याची संधी द्यावी, ते काम करायला मला आवडेल, असंही त्यांनी बोलून दाखवलं. महायुती सरकारमध्ये सध्या आरोग्यखातं हे शिवसेनेकडेच असून प्रकाश आबिटकर हे या खात्याचे मंत्री आहेत.

बांगर यांनी यावेळी शिवसैनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनी-टाईम तयार असतात. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदेसाहेबांचा आदेश सर आखो पर असतो. निवडणुकीचे रणशिंग फुंकलेलंच असून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही फडकवणार आहोत, असेही त्यांनी म्हटलं.

Mahayuti government
मोठी बातमी : मुंबईत रेस्टॉरंट, डान्स बारवर धाडी टाकणारी शाखा बंद : पोलीस आयुक्तांचा निर्णय, धिंगाणा पुन्हा सुरु होणार?

यंदाही श्रावण महिन्यानिमित्त 4 ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा निघणार आहे. याबाबत बांगर म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे या कावड यात्रेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती बांगर यांनी दिले.

कोकाटे हे सर्वात चांगले मंत्री

आमदार संतोष बांगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्याची शक्यता असून त्यांच्या राजीनाम्याच्या सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. कोकाटे हे सर्वात चांगले मंत्री आहे. माणिकराव कोकाटे रमी खेळत नव्हते, त्यांचा व्हिडिओ क्रॉप केलेला आहे. अलिकडच्या काळात कुणीही काहीही क्रॉप करुन बनवत असल्याचंही धक्कादायक विधानही बांगर यांनी यावेळी केलं आहे.

माणिकराव कोकाटे यांनी रमी वगैरे काही खेळलेली नाही, तो व्हिडिओ क्रॉप केलेला असल्याचं विधान करत आमदार बांगर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ते म्हणाले, सध्या क्रॉप करून काहीही करत आहेत. तुम्हाला संतोष बांगरचं मुंडकं (तोंड) लावत आहेत, मला तुमचं मुंडक लावत आहेत, त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. कोकाटे हे सगळ्यात चांगले मंत्री असून त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याचा दावाही संतोष बांगर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com