Shivsena Politics : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या 24 तासांत राजीनामानाट्य!

Mumbai Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी नियुक्तीनंतर अवघ्या 24 तासांत नाराजीनाट्य रंगले आहे. पदाधिकाऱ्यांनी थे राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Shivsena News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मुंबईमध्ये रखडलेल्या विभागप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची शनिवारी रात्री उशीरा निवड जाहीर केली. मुंबई शहर आणि उपनगरातील ३२ प्रभारी विभागप्रमुख आणि ३ प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यादीला 24 तास होण्याच्या आधीच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य समोर आले. पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

दिंडोशी, विलेपार्ले, गोरेगाव, चारकोप येथील पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंकडे आलेले जितेंद्र जावळे यांना विलेपार्लेचे विभागप्रमुखपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांची नियुक्ती विलेपार्लेच्या प्रभारी विधानसभा प्रमुखपदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी थेट बंडाचा झेंडा हाती घेत आपण विद्यमान विभागप्रमुखांच्या हाताखाली काम करणार नसल्याचे सांगितले.

गणेश शिंदे यांची गोरेगाव व दिंडोशी विधानसभेत प्रभारी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी देखील नाराजी व्यक्त करत जर पक्षाने न्याय नाही दिला तर शेकडो कार्यकर्त्यांसह राजीनामा देऊ असा इशारा दिला आहे. शिंदे हे विभागप्रमुखपदासाठी इच्छुक होते.

चारकोप विधानसभेतील पदाधिकारी देखील नाराज आहेत. विधानसभा प्रमुख संजय सावंत यांनी देखील थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

Eknath Shinde
Manoj Jarange ultimatum : मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा 'अल्टीमेटम'; थेट 1994च्या जीआर हात घालण्याची तयारी

प्रभारी विभाग प्रमुख

भांडुप - अशोक पाटील

मुलुंड - जगदीश शेट्टी

विक्रोळी - दत्ता दळवी

घाटकोपर पश्चिम - बाबा हांडे

घाटकोपर पूर्व - सुरेश आवळे

मानखुर्द-शिवाजी नगर - अखतर कुरेशी

मालाड पश्चिम - अजित भंडारी

दहिसर - राम यादव

बोरिवली - सचिन म्हात्रे

मागाठाणे - मनोहर देसाई

अंधेरी पश्चिम - राजू पेडणेकर

वर्सोवा - अल्ताफ पेवेकर

दिंडोशी - वैभव भरडकर

गोरेगांव - स्वप्नील टेंबवलकर

अंधेरी पूर्व - मूर्ती पटेल

जोगेश्वरी पूर्व - ज्ञानेश्वर सावंत

वांद्रे पश्चिम, वांद्रे पूर्व, विमानतळ

विभाग - कुणाल सरमळकर

चांदिवली - दिलीप लांडे

कलिना - महेश पेडणेकर

कुर्ला - विनोद कांबळे

कुलाबा - गणेश सानप

मलबार हिल - प्रवीण कोकाटे

मुंबादेवी - रुपेश पाटील

भायखळा - विजय लिपारे

वरळी - दत्ता नरवणकर

शिवडी - नाना आंबोले

अणुशक्ती नगर - अविनाश राणे

चेंबुर - तुकाराम काते

सायन कोळीवाडा - मंगेश सातमकर

धारावी - भास्कर शेट्टी

माहीम - भाई परब

वडाळा - सुनील मोरे

प्रभारी विधानसभा प्रमुख

दिंडोशी आणि गोरेगांव - गणेश शिंदे

विलेपार्ले - जितू जनावडे

वांद्रे पश्चिम - विलास चावरी

Eknath Shinde
Maratha Reservation : जरांगेंना बळ मिळणार, आता कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री; मराठा व कुणबीबाबत महत्वाचा उल्लेख...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com