Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदेंकडून ठाकरेंवर मोठा प्रहार; क्लिप, फोटो दाखवत म्हणाले, आपलं ठेवायचं झाकून अन्...

Background of the 'Jai Gujarat' Slogan Controversy : एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात जय महाराष्ट्रपाठोपाठ जय गुजरातचा नारा दिला होता. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी शिंदेवर सडकून टीका केली जात आहे.
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde On Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde’s Criticism of Uddhav Thackeray : 'जय गुजरात'च्या वादावरून राजकारण तापलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्याआधी त्यांनी सोशल मीडियातून याबाबत स्पष्टीकरण दिले होते. पण पत्रकार परिषदेत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप आणि काही फोटो दाखवत जोरदार प्रहार केला.

एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात जय महाराष्ट्रपाठोपाठ जय गुजरातचा नारा दिला होता. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी शिंदेवर सडकून टीका केली जात आहे. शिंदेंनी त्याला पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते’, असे म्हणत त्यांनी पहिला प्रहार केला.

उद्धव ठाकरे यांची जय गुजरात म्हटलेली एक व्हिडीओ क्लिपही शिंदेंनी पत्रकार परिषदेत दाखवली. ठाकरेंच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर गुजराती भाषेतील पत्रक तसेच आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला एका होर्डिंगचा फोटोही शिंदेंनी यावेळी दाखवला. या होर्डिंगव ‘केम छो वरळी’ असे गुजरातीत लिहिलेले होते. या तीन मुद्द्यांवरून शिंदेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : ‘जय गुजरात’चा वाद शिंदेंच्या चांगलाच जिव्हारी; लांबलचक पोस्टमधून महाराष्ट्राला केलं सावध...

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून... अशा शब्दांत शिंदेंनी टीका केली. त्यांनी हे मतांसाठी केलं होतं. मी तिथे गुजरात समाजातील लोकांसाठी हे बोललो होतो. त्याआधी मी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हटलेलो. मराठी हा आमचा श्वास आणि हिंदूत्व हा आमचा आत्मा आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना निवडणुकीत जागा दाखवली आहे, अशी टीकाही शिंदेंनी केली.

दरम्यान, त्याआधी शिवसेनेने सोशल मीडियात पोस्ट करूनही ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘जय गुजरात’ ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही, सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती. त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यावे. ‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता?

Eknath Shinde On Uddhav Thackeray
Narendra Modi : मोदींनी त्रिनिदादमध्ये दाखवून दिली भारताची ताकद; अख्खा देश म्हणत असेल, वाहवा!

आज या मुद्यावरून जे टीका करत आहेत, त्यांच्या नेत्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा यापूर्वी दिलेली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ‘केम छो वरळी’ ही होर्डिंग्ज लावणारे कोण होते? ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी प्रसिद्धिपत्रके पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करणारे कोण होते? त्यांनी गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग केले. परंतु, आम्ही गुजरातला जन्मभूमी आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानून राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांची प्रशंसा केली. त्यात कुठलेही राजकारण नव्हते, असे या पोस्टमध्ये म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com