Narendra Modi : मोदींनी त्रिनिदादमध्ये दाखवून दिली भारताची ताकद; अख्खा देश म्हणत असेल, वाहवा!

PM Modi’s Trinidad & Tobago Visit Highlights : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने जोरदार तयारी सुरू केली आहे.
PM Narendra Modi in Trinidad
PM Narendra Modi in TrinidadSarkarnama
Published on
Updated on

Bihar Connection Abroad : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच रणशिंग फुंकले आहे. पण सध्या ते परदेश दौऱ्यावर असूनही अनेकांना मोदींच्या रणनीतीच चुणूक दिसून आली. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांत पोहचलेल्या मोदींनी येथील पंतप्रधानांचे थेट बिहारी कनेक्शन सांगितले. एवढेच नाही तर तेथील पटना स्ट्रीटचाही उल्लेख केला. मोदींच्या स्वागतासाठी भोजपुरी गाणं, ढोल अन् 38 मंत्री भारतीय पोशाखात सज्ज होते.

बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींच्याही काही सभा झाल्या आहेत. पण आज तब्बल 15 हजार किलोमीटर अंतरावरील त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांतूनही त्यांनी बिहारचा डंका वाजवले.

गोव्यापेक्षाही या देशाची लोकसंख्या कमी आहे. केवळ 13 लाख लोकसंख्या असून त्यापैकी 45 टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यातही बिहार आणि उत्तर प्रदेशातील भोजपुरी भाषिक जिल्ह्यांतील नागरिकांचा अधिक समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात भारतातून अनेकजण मजूर म्हणून त्रिनिदादमध्ये आले होते. त्यानंतर ते येथेच स्थायिक झाले.

PM Narendra Modi in Trinidad
Sanjay Raut : शिंदेंनी ‘जय गुजरात’ची गर्जना करताच राऊतांनी फडणवीसांकडे केली मोठी मागणी; म्हणाले, ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा...

त्रिनिदादच्या बिहार कनेक्शनचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी घरवापसीचेही आवाहन केले. याच देशात पटना स्ट्रीट नावाने एक रस्ताही आहे. त्याचाही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केला. या देशाच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसार यांचे वंशज हे बिहारमधील बक्सर भागातील असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच बिहारची मुलगी असेही संबोधले.

कमला प्रसाद यांचे वंशज राम लखन मिश्रा हे 1889 मध्ये मंजूर म्हणून त्रिनिदादला गेले होते. ते तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या वंशज कमला या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. 2018 मध्ये त्यांची या पदावर निवड झाली. त्यांच्यासमोरच पंतप्रधान मोदींनी बिहारमधील पंरपरांचा केवळ भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमान असल्याचे सांगितले.

PM Narendra Modi in Trinidad
Assembly Session : अध्यक्षांच्या खुर्चीवरून चेतन तुपे हे काय बोलले? नार्वेकरांचाही चेहरा उतरला, नाराजी अन् कारवाईचे संकेत...

त्रिनिदादमध्ये आलेल्या भारतीयांविषयी मोदी म्हणाले, ते आपी माती सोडून आले पण आत्मा सोडला नाही. ते केवळ स्थलांतरित नव्हते तर नागरिकीकरणाचे संदेशवाहक होते, असा गौरव मोदींनी केला. या कार्य़क्रमानंतर दोन्ही पंतप्रधानांनी एकत्रितपणे जेवणाचाही आस्वाद घेतला. तिथेही बिहार कनेक्शन होते. पंतप्रधानांना सोहरीच्या पानावर जेवण देण्यात आले होते. बिहारमधील पंरपरेनुसार सोहरी किंवा केळीच्या पानात जेवण दिले जाते. त्यामुळे त्रिनिदादचा मोदींचा दौरा आणि बिहार निवडणुकीचे कनेक्शनही आता जोडले जाऊ लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com