

Palghar Politics : पालघर,वसई-विरारमध्ये शिवसेनेचा हक्काचा मतदार होता. मात्र, 2014 नंतर भाजपने पालघर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यानंतर वसई-विरारमध्ये देखील शिरकाव केला. भाजपची वाढणारी ताकद ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे.
वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या दारुण प्रभावानंतर प्रथमच वसई तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यात पक्ष वाढीसाठी रणनीती ठरवली आहे.
संपर्कप्रमुख म्हणून पक्षवाढीसाठी पांडुरंग पाटील यांच्यावर जबाबदारी एकनाथ शिंदेंनी दिली आहे. पाटील यांनी पुन्हा शिवसेनेचा भगवा डौलने फडकवू, अशी गर्जना देखील केली आहे.
कार्यकर्त्यांना आवाहन करत ते म्हणाले, सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा.शासनाच्या असंख्य योजनांचा लाभ शिवसेना शाखांच्या माध्यमातून सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवा.
पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचा पाया असलेल्या शाखा ते मजबुत करणार आहेत. शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्या नागरिकांपर्यंत पोहोचवणार. तसेच शाखांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कसे पोहोचले, त्यांची अडचणी कशा सोडवल्या याचा आढावा घेणार आहे. तसेच संघटन वाढीसाठी रिक्त जागा त्वरित भरण्याचेही आदेश त्यांनी दिले.
या बैठकीत सर्व पदाधिकारी यांना पुन्हा जोमाने काम करण्यासाठी पाटील यांनी शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना प्रेरित केले. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका हेमलता सिंग यांचा सत्कार पक्षाच्या वतीने करण्यात आला.या बैठकीचे आयोजन जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी केले होते. यावेळी जिल्हा सचिव अतुल पाटील, जिल्हा संघटक शीतल कदम, शिवसेना व संलग्न संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.