Eknath Shinde vs Ravindra Chavan : शिंदे–चव्हाणांमधील 'कोल्ड वॉर' कायम, एका मंचावर येऊनही संघर्षाची ठिणगी, म्हात्रे विरुद्ध म्हात्रे’ लढतीने टेन्शन वाढवले!

KDMC Election Eknath Shinde : कल्याण-डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण यांचा संघर्ष अधिक टोकणार होण्याची शक्यता आहे. म्हात्रे परिवारातील उमेदवारासाठी दोघांनी प्रतिष्ठपणाला लावली आहे.
Eknath Shinde vs Ravindra Chavan
Eknath Shinde vs Ravindra Chavan sarkarnama
Published on
Updated on

KDMC News : भाजप-शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली फोडाफोडीची स्पर्धा शिगेला पोहोचली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शनिवारी एका कार्यक्रमात एकत्र आले. मात्र ‘युतीतील एकजूट’ असा संदेश उभा राहायला हवा असताना उलट या दोघांतील 'कोल्ड वॉर' पुन्हा एकदा उघडपणे दिसून आला.

चव्हाण-शिंदे कोल्ड वाॅरचा केंद्रबिंदू ठरला तो डोंबिवली पश्चिमेतील पॅनल 22. येथे दिवंगत नगरसेवक व माजी सभापती वामन म्हात्रे यांच्या वारशावरून राजकीय संग्राम तापला आहे. शिवसेनेकडून वामन म्हात्रेंचे बंधू बाळा म्हात्रे यांना उतरण्याची तयारी आहे, तर भाजपकडून त्यांचा मुलगा अनमोल म्हात्रे यांना मैदानात उतरवण्यावर जोर आहे. अनमोलचा भाजप प्रवेश अलीकडेच मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.

निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंनी स्पष्ट संदेश दिला की,“वामन म्हात्रेंचा खरा आशीर्वाद बाळा म्हात्रेंनाच आहे… ते जिथे जातात तिथे सत्ता येते. बाळा आपल्या बाजूने आहे, आता तुम्ही समजून घ्या.” या विधानाने पॅनल 22 मधील समीकरणांना थेट छेद दिला.

Eknath Shinde vs Ravindra Chavan
Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आणखी एक अटक, तेजवानीनंतर अधिकाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

रवींद्र चव्हाण यांनी पलटवार करत म्हटले की, “वामन म्हात्रे आणि माझे अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्यांनी अनेकदा मला आशीर्वाद दिला आहे. त्यांची मुलगी भाजप नगरसेविका आहे. त्यांनी सांगितले होते युती असो वा नसो, अनमोललाच आशीर्वाद द्यायचा.”

पुढे ते म्हणाले, अनमोलला वामन म्हात्रेंचा आणि माझा आशीर्वाद आहे… डायरेक्ट लिंक माझीच आहे.”

चव्हाण आणि शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजुनही महायुतीमधील वर्चस्वाची लढाई संपली नसल्याचेच स्पष्ट होते. दरम्यान, पॅनल 22 मध्ये आता लढत ‘म्हात्रे विरुद्ध म्हात्रे’ अशी होणार आहे. पण प्रत्यक्षात ती शिंदे विरुद्ध चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

वामन म्हात्रे कोण?

डोंबिवलीतील राजकीय वर्तुळातील मोठे नाव म्हणून वामन म्हात्रेकडे पाहिले जात होते. ते तब्बल पाच वेळा निवडून शिवसेना नगरसेवक म्हणून विजयी झाले. तीनवेळा केडीएमसीचे सभापती, एकदा अपक्ष म्हणूनही विजय.

Eknath Shinde vs Ravindra Chavan
Devendra Fadnavis : वेगळा विदर्भ, निधीवरून डिवचणाऱ्या वडेट्टीवारांना फडणवीसांचे जोरदार प्रत्यूत्तर अन् सल्लाही; म्हणाले, 'आधी काय काय बदल...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com