Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आणखी एक अटक, तेजवानीनंतर अधिकाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

Pune Police Arrested Deputy Registrar Ravindra Taru in Mundhwa Land Scam : मुंढवा येथील जमीन व्यवहार गैरव्यवहारामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक केलीय.
Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आणखी एक अटक, तेजवानीनंतर अधिकाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या
Published on
Updated on
Summary
  1. मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक केली होती.

  2. पोलिस तपासात तेजवानी ही पॉवर ऑफ अटॉर्नी असल्याचे उघड झाले.

  3. त्याच प्रकरणात आता दुय्यम निबंधक अधिकारी यांनाही अटक करत तपास आणखी वेग घेत आहे.

Pune News : पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या खरेद घोटाळ्याच्या प्रकरणात आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एका व्यक्तीला बावधन पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. यामुळे या घोटाळ्या प्रकरणास नवे वळण लागले असून आणखीन धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

या घोटाळ्यातील 40 एकर जमिन अमेडिया कंपनीने केवळ काही कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. शासकीय परवानगीशिवाय ही जमीन बेकायदेशीररित्या विकली गेली. या व्यवहारात काही कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले गेले नाही. ज्यामुळे शासनाची थेट फसवणूक झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु या़ंच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोव्हेंबर महिन्यात नोंदवलेल्या या गुन्ह्यात रवींद्र तारू यांच्यासह अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांचा समावेश आहे.

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आणखी एक अटक, तेजवानीनंतर अधिकाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या
Koregaon Park land scam: "जय पवारांच्या लग्नाला जायचं आहे": कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातील आरोपीची पोलिसांना विनंती; अंजली दमानियांचा विरोध

हा खरेदी दस्तऐवज तयार करताना नियमांना धक्का लावला आणि चुकीच्या कागदपत्रांद्वारे व्यवहार संमती दिली. यामुळे यापूर्वी तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून आज तारू यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आधीच शीतल तेजवानी यांना 3 डिसेंबर रोजी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यानंतर पोलिसांनी पिंपरीतील माहेरघरी 5 डिसेंबरला छापे टाकून पुरावे जप्त केले आहेत. दिग्विजय पाटील याचीही 1 डिसेंबरला चौकशी झाली होती.

आता पुन्हा 8 डिसेंबरला पाटीलची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढील तपासात आणखी अटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बावधन पोलिसांनी सांगितले, यांनी विवादात असलेला तो दस्त नोंदवला होता त्यामुळे त्यांना आज भोर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. "तपास सुरू असून, सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले जातील."

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आणखी एक अटक, तेजवानीनंतर अधिकाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या
Pune Land Scam : गाजलेल्या पुणे जमीन प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; मुख्य सुत्रधाराला ठोकल्या बेड्या

FAQs :

1. प्रश्न: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे?
उत्तर: जमीन दस्तावेजांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.

2. प्रश्न: शीतल तेजवानी कोण आहे?
उत्तर: ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असून पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणून तिची भूमिका समोर आली आहे.

3. प्रश्न: रवींद्र तारू यांना का अटक करण्यात आली?
उत्तर: ते मुद्रांक दुय्यम निबंधक असून त्यांच्या भूमिकेत अनियमिततेचा संशय तपासात पुढे आला.

4. प्रश्न: या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे का?
उत्तर: तपास सुरू असल्याने आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

5. प्रश्न: या कारवाईचा पुण्यातील जमीन नोंदणी व्यवस्थेवर काय परिणाम?
उत्तर: फसवणूक प्रकरणांवर पोलिस अधिक कडक भूमिकेत जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com