Devendra Fadnavis : वेगळा विदर्भ, निधीवरून डिवचणाऱ्या वडेट्टीवारांना फडणवीसांचे जोरदार प्रत्यूत्तर अन् सल्लाही; म्हणाले, 'आधी काय काय बदल...'

Devendra Fadnavis On Vijay Wadettiwar : राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन उद्या सोमवार (ता.८) पासून सुरू होत आहे. पण त्याआधी अधिवेशनाच्या पूर्व संध्येलाच विरोधकांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केलीय.
Winter Session of the Maharashtra Assembly;  Vijay Wadettiwar And Devendra Fadnavis
Winter Session of the Maharashtra Assembly; Vijay Wadettiwar And Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ राज्याची मागणी पुन्हा पुढे करीत फडणवीस सरकारवर निधी अभावाचा आरोप केला.

  2. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ नंतर विदर्भात मोठे बदल झाले असल्याचे सांगून वडेट्टीवारांना टोला लगावला.

  3. या वादामुळे विदर्भ राज्याचा मुद्दा पुन्हा जोरात चर्चेत आला आहे.

Nagpur News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत. एकेकाळी वेगळ्या विदर्भाची मागणी तेच करत होते. ते आता अकरा वर्षांपासून सत्तेत आहेत. तरीही विदर्भाचा विकास होताना दिसत नाही, पुरेसा निधी विदर्भाला मिळत नाही असा आरोपही त्यांनी केला. यावर फडणवीस यांनी २०१४ सालापूर्वीचा आणि २०१४ नंतरचा विदर्भ त्यांनी बघावा असे सांगून विदर्भात काय बदल घडला आहे, हे समजून घ्यावे असा टोला वडेट्टीवारांना लगावला आहे.

सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला प्रांरभ होत आहे. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी विदर्भाचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भाकडे लक्ष नाही, सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात पळवला जात आहे. नागपूरचे अधिवेशन फक्त पुरवणी मागण्यांसाठी घेतल्या जात आहे.

महायुती सरकाराला विदर्भ, विदर्भातील शेतकऱ्यांची काळजी नाही. महाराष्ट्रात सरासररी रोज सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यात विदर्भातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र शब्द देऊनही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली जात नाही. तारखेवर तारखा दिल्या जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता.

Winter Session of the Maharashtra Assembly;  Vijay Wadettiwar And Devendra Fadnavis
Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष, नेमकं कारण काय?

तसेच या सरकारचा सर्व भर फक्त पायाभूत सुविधांवर दिसतो. हे सर्व कंत्राटदारांच्या भल्यासाठी केले जात आहे. फक्त मोठ मोठ्या शहरांसाठी कोट्यवधींचे टेंडर काढले जात आहे. राज्याला दिवाळखोरीत नेलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

तसेच फडणवीस विरोधात असताना स्वतंत्र विदर्भाची मागणी करत होते. पण आता सत्तेत आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला आहे. आजही नागपूर आणि विदर्भातील युवकांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैदराबादला जावे लागते. मुख्यमंत्री नागपूरचे असताना विदर्भाला काय फायदा असा सवालही वडेट्टीवारांनी केला.

या आरोपांचा आणि दाव्यांचा समाचार फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत घेतला. ते म्हणाले, महायुतीचे सरकार आल्यापासून विदर्भाचा झपाट्याने विकास होत आहे. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळातला आणि आताचा विदर्भ बघवा. पंधरा वर्षांच्या कार्यकाळात विदर्भ किती बदलला, किती विकास झाला हे त्यांना दिसेलच.

Winter Session of the Maharashtra Assembly;  Vijay Wadettiwar And Devendra Fadnavis
Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष, नेमकं कारण काय?

FAQs :

1. प्रश्न: विदर्भ राज्याची मागणी पुन्हा का पुढे आली?
उत्तर: विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाला पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप करत मागणी पुन्हा अधोरेखित केली.

2. प्रश्न: फडणवीसांनी वडेट्टीवारांना काय उत्तर दिले?
उत्तर: त्यांनी २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा विदर्भ पाहावा, विकास स्पष्ट दिसेल असा टोला लगावला.

3. प्रश्न: विदर्भाचा विकास हा खरोखरच वादाचा मुद्दा आहे का?
उत्तर: होय, निधी, प्रकल्प आणि राज्य दर्जाबाबत राजकीय वाद सुरूच आहे.

4. प्रश्न: विदर्भ वेगळे राज्य करण्याची मागणी नवीन आहे का?
उत्तर: नाही, ही मागणी दशकांपासून सातत्याने पुढे येत आहे.

5. प्रश्न: या वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम?
उत्तर: सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष वाढला असून विदर्भाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com