Eknath Shinde News : स्थानिक स्वराज संस्था निवडणूक महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार की युतीमध्येच हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे होम ग्राऊंड असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्यासमोर मंत्री गणेश नाईक यांनी आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना मोठा झटका देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोडले आहे.
चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत पाटील यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले हेदेखील उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याच्या दृष्टिने शिंदेंनी हे पाऊल टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेत होत असलेले एन्कमिंग हे एकप्रकारे भाजपला देखील इशारा असल्याची चर्चा आहे.
चंद्रकांत पाटील हे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक माथाडी युनियमध्ये पूर्वीपासून सक्रीय आहेत. त्यामुळे कामगार वर्गात त्यांचा चांगला संपर्क आहे. भूमिपूत्र देखील त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दुबळा बनला आहे.
विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. बेलापूर मतदारसंघातून त्यांनी मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. मात्र, त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर ते पक्षात फारसे सक्रीय दिसले नाहीत. सोशल मीडियावर देखील दे शेअर करत असलेल्या पोस्टमध्ये कुठेही पक्षाचा उल्लेख करत नाहीत. माजी आमदार असाच त्यांच्या नावानंतर उल्लेख असतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ते भाजपमध्ये सक्रीय होणार का? याच्या चर्चा जोर धरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.