मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक घोषणा करत पुन्हा एकदा नवा डाव खेळला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथविधी घेणार आहेत.(Eknath Shinde Latest Marathi News)
फडणवीस आणि शिंदे हे आज दुपारी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. अनेकांना असेच वाटत होते की फडवणसी हे मुख्यमंत्री आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात उलटे घडले असून शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस हे सरकारबाहेर राहणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याला हे पद मिळणार आहे.(Maharashtra Political Crisis News)
फडणवीस यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. आज केवळ एकटे शिंदे हेच संध्याकाळी शपथ घेणार आहेत. भाजपचे 106, शिंदे गट आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज राज्यपालांना देण्यात आले. या सरकारला माझे पूर्ण सहकार्य राहील आणि या सरकारला यशस्वी होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. राज्याला विकासात अग्रेसर ठेवण्याचे काम केले जाईल. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मिळणार नाही. ते मंत्रीमंडळात नसले तरी राज्याच्या विकासात ते आमच्यासोबत आहेत. पद मिळत असताना, ते घेणे सहज शक्य असताना फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद घेतले नाही. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.