शिवसेनेतील नवी पदाधिकारी निवड ठाकरेंसाठी ठरली डोकेदुःखी

नव्याने नियुक्त्या कोणाच्या सांगण्यानुसार करण्यात आल्या, याचा बोलविता धनी कोण, असा सवाल काही नाराज माजी पदाधिकारी करीत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेने (shivsena) नुकतीच चेंबूरमधील (Chembur) नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मात्र, नवी पदाधिकारी निवड शिवसेना पर्यायाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची डोकेदुखी ठरली आहे. कारण, या नवीन नियुक्‍त्‍यांमुळे चेंबूरमधील काही शिवसैनिकांमध्‍येही नाराजी पाहायला मिळत आहे. शिंदे गट अगोदरच बाहेर पडला आहे, त्यात शिवसैनिकांमधील नाराजी पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे पक्षप्रमुख यातून कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागणार आहे. (Election of new office bearers in Shiv Sena turned out to be a headache for Thackeray)

Uddhav Thackeray
बारामतीचा कार्यक्रम २०१९ मध्ये हुकलाय; तो २०२४ ला करायचाय : भाजप नेत्याचा इशारा

शिवसेनेला जोमाने उभे करण्याकरीता आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्‍यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चेंबूर विधानसभा क्षेत्रातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. मात्र, या नव्याने नियुक्त्या कोणाच्या सांगण्यानुसार करण्यात आल्या, याचा बोलविता धनी कोण, असा सवाल काही नाराज माजी पदाधिकारी करीत आहेत. या नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट चेंबूर नाका येथील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय गाठून आपली नाराजी व्यक्त केली. त्‍यामुळे शिवसेनेपुढील अडचणी वाढत असल्‍याचे दिसत आहे. दरम्‍यान, या संदर्भात शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्याशी संपर्क न झाल्‍याने त्‍यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

Uddhav Thackeray
‘हर्षवर्धन पाटीलसाहेब, तुमचा त्रास कमी झाला का..? नसेल तर आपल्याकडील पान्याने टाईट करू’

चेंबूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत बदल झाले आहेत. चेंबूर कॅम्पमधील शाखा क्रमांक १५४ मधून सुरेश माने, तर माहुल वाशीनाका परिसरातील शाखा क्रमांक १५५ मधून संजय राठोड यांच्याऐवजी दोन नवीन शाखाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखाप्रमुख चांगले कार्य करीत असताना त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने शिवसैनिक नाराज असल्‍याची चर्चा येथे सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray
'मी आमदारकीचा राजीनामा देतो; रोहित पवारांनीही राजीनामा देऊन कर्जत-जामखेडच्या मैदानात उतरावे'

नवीन पदाधिकारी निवड आणि शिवसैनिकांमधील नाराजीसंदर्भात शिवसेनेचे विभागप्रमुख मंगेश सातमकर म्हणाले की, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही. याबाबत शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा करणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com