INDIA Aghadi : मधु दंडवतेंच्या कार्यक्रमात इंडिया आघाडीचा एल्गार..!

Madhu Dandavate Birth Centenary Program : मोदी पराभूत होऊ शकतात ; शरद पवारांनी मांडले विचार
Madhu Dandavate
Madhu DandavateSarkarnama
Published on
Updated on

- संजय परब

INDIA Aghadi : माजी अर्थमंत्री आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात इंडिया आघाडीचा एल्गार पाहायला मिळाला. ‘आज दंडवते असते तर त्यांनी सुद्धा सत्ताधारी भाजप विरोधात उभे राहून एकजुटीने लढण्याची ताकद दिली असती. या देशात लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर आताच सर्व समाजवादी, काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे’, असा सारांश या कार्यक्रमात सर्व नेत्यांकडून मांडण्यात आला.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होऊ शकतो. लोकशाहीत काहीही शक्य आहे, असे स्पष्ट विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि इंडिया आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी देशभरातले नेते उपस्थित होते. यावेळी मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या मंत्रीपदाच्या भरीव कामगिरीचा जागर करताना राजकारणी किती साधा, स्वच्छ आणि कमालीचा प्रामाणिक असू शकतो याकडे प्रमुख वक्त्यांनी लक्ष वेधले.

Madhu Dandavate
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे नाशिकला; मुख्यमंत्री शिंदेंनी साधला मोठा डाव...

सध्याच्या फाटाफुटीचा शाप लागलेल्या राजकारणात दंडवते यांचे महत्व कमालीचे अधोरेखीत होते, हे यावेळी दिसून आले. ‘1977च्या सुमारास सुद्धा इंदिरा गांधी यांचा पराभव होऊ शकत नाही, अशी स्थिती होती. पण लोकांनी सत्ता पलटवून दाखवली. जयप्रकाश नारायण आणि दंडवते यांच्यासारख्या नेत्यांनी रस्त्यावर उतरत अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. लोकशाहीत हे शक्य आहे. आता सुद्धा मोदी यांचा पराभव होऊ शकतो’, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देशातील सध्याच्या अराजक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रामाचा राजकीय वापर करत असल्याचे बोलून दाखवले. ‘राम काही फक्त भाजपचा नाही, तो सर्व भारताचा आहे आणि येथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा आहे. पण, हिंदू खतरे में है, असे दाखवत भारतात फाटाफूट केली जात आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण भाग आणि लहान मुलांमध्ये दुहीचे बीज पेरले जातय आणि हे देशासाठी घातक आहे.

महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून लोकांचे लक्ष धर्माकडे वळवले जात आहे’, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे या कार्यक्रमाला आधी येणार होते. पण, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे विचार वाचून दाखवण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कानगो यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य केले.

(Edited by Amol Sutar)

Madhu Dandavate
Manoj Jarange: दूध-भाकरीची शिदोरी घेऊन जरांगे मदरशातून बाहेर पडताच लेकरं गहिवरली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com