Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे नाशिकला; मुख्यमंत्री शिंदेंनी साधला मोठा डाव...

Balasaheb Thackeray : ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला हे स्पष्ट करण्याचा खटाटोप ?
Banners in Mumbai
Banners in MumbaiSarkaarnama
Published on
Updated on

Maharashtra Politcs On Ayodhya Ram Temple : अयोध्येत आज तब्बल पाचशे वर्षांनी होणाऱ्या राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. तर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षण देशभर उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतच थांबणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. ठाकरे नाशिकला रवाना झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी इकडे मोठा डाव साधल्याची चर्चा आहे.

Banners in Mumbai
Eknath Khadse On Ayodhya Ram Mandir : भाजपच्या प्राणप्रतिष्ठेला एकनाथ खडसेंचे 'जय श्रीराम'चे सणसणीत उत्तर!

ठाकरे नाशिकला गेले तर मुख्यमंत्री शिंदे मुंबईतील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करणार आहेत. बाबरी मस्जित पाडली त्यावेळी बाळासाहेबांनी त्याची जाबाबदारी छातीठोकपणे त्याची जबाबदारी घेतली होती. आता २२ जानेवारीला अयोध्यात राम मंदिराचे लोकापर्ण होत आहे. तर २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती आहे. या योग साधून एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत.

Banners in Mumbai
Uddhav Thackeray : बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातलं होतं? ठाकरे गटाने भाजपाला पुन्हा डिवचलं

उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न

आज राम मंदिरात प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही ऐनवेळी आमंत्रण दिले गेले. दरम्यान, ठाकरेंचा नाशिक दौरा ठरला होता. ते काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तर उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ते नाशिकमध्येच अधिवेशन घेणार आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.

Banners in Mumbai
Shivsena Political : ठाकरेंच्या अधिवेशनापूर्वी शिंदे गटाची कुरघोडी ; केली 'ही' घोषणा...

बाळासाहेबांना अभिवादनाची तयारी

बाबरी मस्जिद पाडण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक होते. त्यामुळे राम मंदिर उभारण्यात त्यांचा वाटा सर्वाधिक असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिवसैनिक आज त्यांच्या स्मृतीस्थाळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. यासाठी भव्य शोभायात्राही काढण्यात येणार आहेत.

ठाकरे नाशिकला असतना शिंदेंनी हा डाव साधला आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना हिंदुतत्वाचा विसर पडला आहे, हे सांगण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यांना महत्वाच्या दिवशीही बाळासाहेबांचा विसर पडला आहे, हे सांगण्याची संधी आयतीच मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (एकनाथ शिंदे) आणि त्यांचे शिवसैनिक आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थाळावर जाऊन अभिवादन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. त्यांचसोबत आजुबाजूच्या परिसरातही पंतप्रधान मोदींचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. यातून ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला फोडणी मिळाल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Banners in Mumbai
Ram Temple Consecration : लालकृष्ण अडवाणी अयोध्येतील सोहळ्यास जाणार नाहीत; काय आहे कारण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com