मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर विखेंचे अतिक्रमण; बदलीचा आदेश काढला महसूल विभागाने...

CM Eknath Shinde : पदे तीन,अधिकारी चार, कुठल्या अतिरिक्त आयुक्तांचा पत्ता होणार कट ?
CM  Eknath Shinde, Radhakrishna Vikhe-Patil Latest News
CM Eknath Shinde, Radhakrishna Vikhe-Patil Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी:साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची पदोन्नतीवर पिंपरी-चिंचवड महापलिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.नगरविकास विभागाकडून होणाऱ्या या बदलीचा आदेश महसूल विभागाने काढलायं हे विशेष. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नगरविकास खात्यावर अतक्रमण करीत भाजपचे (BJP) राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल खात्याने हा आदेश काढल्याने त्याची मोठी चर्चा सुरु आहे. (CM Eknath Shinde, Radhakrishna Vikhe-Patil Latest News)

CM  Eknath Shinde, Radhakrishna Vikhe-Patil Latest News
'तो त्रिवेदी शिवाजी महाराजांबद्दल बोललायं..'; संभाजीराजे फडणवीसांवर भडकले...

तीन महिन्यांपूर्वी १८ ऑगस्टला साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून आले आहेत.त्यानंतर साताऱ्यात त्यांच्यांशी चांगले सख्य असलेले थोरवे हेही पिंपरी पालिकेत आल्याने शेखरसिंह हे आपली टीम येथेही तयार करायला लागल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

दरम्यान,पालिकेत प्रशासन या महत्वाच्या विभागप्रमुखांची बदली करीत त्यांच्या जागीही शेखरसिंह यांनी आपल्या मर्जीतील अधिकारी नुकतेच बसवले आहेत.थोरवे यांनी साताऱ्यातील पदभार आज सोडला.येत्या एक-दोन दिवसांत पिंपरीत रुजू होऊ शकतो,असे आज त्यांनी सातारा य़ेथून 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

अतिरिक्त आयुक्तांची पदे तीन आणि अधिकारी झाले चार

थोरवे यांच्या बदलीनंतर पिंपरीतील एका अतिरिक्त आय़ुक्तांवर कुऱ्हाड येणार आहे. पिंपरी पालिकेच्या आकृतीबंधानुसार तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत.त्यातील दोन पदे राज्य सेवेतील, तर एक पद हे पालिका सेवेतील अधिकाऱ्यांतून भरले जाते.

सध्या पालिका सेवेतील अधिकारी आणि नगरसचिव उल्हास जगताप प्रभारी अतिरिक्त आयुक्त आहेत.मात्र,पालिका सेवेतील कुठलाच अधिकारी अतिरिक्त आयुक्त म्हणून लायक नसल्याचे पिंपरी पालिका प्रशासनाने सरकारला कळविल्याने थोरवेंची बदली पिंपरीत करण्यात आली आहे. त्यामुळे जगताप यांना प्रभारी अतिरिक्त आयुक्तपद (तीन) सोडावे लागण्याची शक्यता आहे.राज्य सेवेतील प्रदीप जांभळे-पाटील आणि जितेंद्र वाघ हे दोन अतिरिक्त आयुक्त एक आणि दोन म्हणून पालिकेत आहेत.

CM  Eknath Shinde, Radhakrishna Vikhe-Patil Latest News
Shivsena : अंधारेंना चिल्लर म्हणणाऱ्या दिपाली सय्यद यांना खैरे म्हणाले `लिप्स्टीकवाली बाई` ..

झगडेंना `मॅट`ने न्याय दिला,तर..

राज्यात सत्ताबदल होताच पिंपरी पालिकेचे (PCMC) आयुक्त राजेश पाटील यांची ऑगस्ट,तर त्यांच्याशी चांगले गुळपीठ असलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची सप्टेंबरमध्ये बदली झाली.ढाकणेंच्या जागी पिंपरी पालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांची पदोन्नतीवर नियुक्ती राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने केली. मात्र,आयुक्त शेखरसिंह यांनी त्यांना दोन आठवडे चार्जच दिला नाही.

दरम्यानच्या काळात नगरविकास विभागाने आपला आदेश फिरवित झगडेंची नियुक्ती रद्द केली. त्यांच्याऐवजी वसई-विरार पालिकेतील जांभळे यांची बदली पिंपरीत अतिरिक्त आयुक्त म्हणून केली. त्यांना, मात्र तातडीने पदभार देण्यात आला.त्यामुळे झगडे या `मॅट`मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) गेल्या असून सध्या रजेवर आहेत. `मॅट`मध्ये त्यांच्याबाजूने निकाल लागला आणि जांभळेच्या जागी (अतिरिक्त आयुक्त एक) त्यांची नियुक्ती करण्याचा आदेश झाला,तर मोठा उलटफेर पिंपरी पालिका प्रशासनात पहायला मिळणार मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com