Maharashtra HSC Result 2023 : बारावीतही मुलींचीच बाजी; तब्बल 93.73 टक्के मुली उत्तीर्ण

12th HSC Result 2023 Date : पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे.
HSC Result 2023 :
HSC Result 2023 :Sarkarnama

Maharashtra Board HSC Result 2023 Date महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल आज (२५ मे) जाहीर कऱण्यात आले. यात १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे. (Even in twelfth As many as 93.73 percent girls passed)

HSC Result 2023 :
Pune Vetal Tekdi : आमदार शिरोळे म्हणतात स्थगिती दिली; मनपाकडून मात्र वेताळ टेकडी रस्त्याची चाचपणी?

राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. (Maharashtra News)

सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे. ( UPSC Result)

सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे. (Marathi news)

HSC Result 2023 :
Joe Biden Murder Plan: सहा महिन्यांपासून..; जो बायडेन यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे धक्कादाक खुलासे...

निकालाची वैशिष्ट्ये:

- ९३.४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

- एकूण विषय संख्या : १५४

- १०० टक्के निकाल लागलेल्या विषयांची संख्या : २३

शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान : ९६.०९ टक्के

कला : ८४.०५ टक्के

वाणिज्य : ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : ९३.३४ टक्के

नागपूर : ९०.३५ टक्के

औरंगाबाद : ९१.८५ टक्के

मुंबई : ८८.१३टक्के

कोल्हापूर : ९३.२८टक्के

अमरावती : ९२.७५टक्के

नाशिक : ९१.६६ टक्के

लातूर : ९०.३७टक्के

कोकण : ९६.०१टक्के

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com