Manoj Jarange: सगळ्यांनी मैदानात या, रोडवर फिरु नका; ज्यांना ऐकायचं नाही...; हायकोर्टाच्या नाराजीनंतर जरांगेंचं भावनिक आवाहन

Manoj Jarange: मीडियावरही जरांगेंनी आरोप केला असून आंतरवलीत काही घडलं नाही पण इथंच घडलंतय म्हणजे काहीतरी षडयंत्र होतंय असं त्यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange: मुंबईत मराठा आंदोलकांच्या हुल्लडबाजीवर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सकारला नियमांनुसार कारवाईचे आदेशही दिले आहेत. यापार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. ज्यांना ऐकायचं नाही त्यांना थेट आदेशच त्यांनी दिला आहे.

Manoj Jarange
Maratha Andolan: "जे आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक समजले जातील, अन्यत्र फिरणाऱ्यांवर होणार कारवाई; सरकारचे स्पष्ट संकेत

जरांगे म्हणाले, "आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचं आपल्याला पालन करायचं आहे. सर्व आंदोलकांनी शांत राहावं. सगळ्यांनी कॉर्नर मैदानात या, रोडवर फिरु नका. तसंच ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी सरळ गावाकडं निघून जावं. तुमच्या लेकरांसाठी मी लढतोय. मुंबईकरांना त्रास होईल असं कुणी वागू नका. मुंबईतील सर्व वाहनं पार्किंगमध्ये लावा. सगळ्यांनी गाड्या मैदानात लावायच्या आहेत आपल्याला जातीला जिंकवयाच आहे" पण काहीही झालं तरी आपण आरक्षण घेऊनच थांबणार आहोत, त्याशिवाय आपण उठणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी जरांगेंनी मांडली.

Manoj Jarange
Mumbai High Court: जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगीच नाहीच! कारवाईसाठी हायकोर्टाचा फडणवीस सरकारला 'फ्री हँन्ड'

मीडियावर केली टीका

सध्या जे आंदोलक आहेत तेच आंतरवलीत देखील होते, पण इथं (मुंबईत) मात्र काहीतरी षडयंत्र होतंय, अशा शब्दांत जरांगेंनी मीडियावरही टीका केली. जरांगे म्हणाले, "आंतरवाली सराटीमध्ये हाच मीडिया हेच पत्रकार आणि आमचे हेच आंदोलनकर्ते होते. पण पत्रकारांना त्रास झाला हे इथंच ऐकायला मिळालं, हे सगळं षडयंत्र आहे. कोणाच्या तरी नादी लागून कोणीतरी फुगवून दिलं आहे, सगळं कळतं आम्हाला"

Manoj Jarange
Maratha Andolan: मराठा आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? विखे म्हणाले, मसुदा तयार फक्त...

तुमच्या एका चुकीमुळं सर्व...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं की, चर्चेसाठी जरांगेंकडून कोणीतरी हवं आहे, त्याशिवाय कोंडी फुटणार कशी? यावर बोलताना जरांगे म्हणाले, मीच आहे चर्चेसाठी. आम्हाला चर्चेला बोलवता स्वतः का येत नाही चर्चेला. तुमचे पाय मोडले का?? १००-१५० मीटरवर आहात तुम्ही. न्यायदेवेतेनं काय सांगितलं आणि तुम्ही काय करता आहात? तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळं एवढं सगळं झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com