Kapil Patil : आधी खासदारकी गेली नंतर शिवीगाळ प्रकरण अन् आता पुतण्यामुळे पुन्हा अडचणीत, माजी मंत्री कपिल पाटलांच्या अडचणी काही थांबेनात

Former Union Minister Kapil Patil : माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधी खासदारकी गेली नंतर मंत्रीपद गेलं आणि आता पुतण्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Kapil Patil
Kapil Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 17 July : माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधी खासदारकी गेली नंतर मंत्रीपद गेलं आणि आता पुतण्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व घटनांमुळे आता पाटील यांच्याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

भाडेकरारनाम्याची बनावट कागदपत्र करून रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्यासाठी शासकीय परवानग्या घेऊन मूळ मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्यासह इतर दोन व्यक्तींविरोधात शहर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील यांच्या पुतण्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. याआधी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या मतदानादिवशी पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता फसवणूक प्रकरणी पुतण्या सुमितवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Kapil Patil
Deepak Mankar News : 'शरद पवारांनी मोठी संधी दिली तर...'; अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष मानकरांच्या मनात नेमकं काय?

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकी प्रकरणी पोलिस (Police) ठाण्यात सुमित पुरुषोत्तम पाटील, सुरेंद्र काशिनाथ पाटील आणि देवेंद्र काशिनाथ पाटील या तिघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिघांनी व्यावसायिक अक्षय राजेंद्र जैन रा. मुंबई यांच्या धामणकर नाका येथील त्यांनी बांधलेल्या गाळ्यांवर व जमिनीवर 1ऑगस्ट 2023 पूर्वी सुमित पाटील याने कब्जा करून तिथे नव्याने सुरु केलेल्या रसोई मल्टीक्युझीन रेस्टोरंट या हॉटेलच्या दुकानाशी कोणताही संबंध नसतांना सुरेंद्र आणि देवेन्द्र पाटील यांना साक्षीदार ठेवून नोटरी करून या दुकानाचा कब्जा घेतला.

Kapil Patil
Nawab Malik News : नवाब मलिक यांनी सुनील तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची घेतली भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

या नोटरीवरून भाडे कारारनाम्याचा बनावट दस्तावेज तयार करून अक्षय जैन यांच्या मालमत्तेच्या पत्त्यावर जीएसटी परवाना, फूड लायसन्स, आरोग्य दाखला,अग्निशमन परवाना, पोलिस लायसन्स असे अनेक परवाने फसवणूक करुन मिळवले. तर या फसवणूकी प्रकरणी जैन यांनी शहर पोलिसांत या तिघांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार आता या 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com