ऋतुजा लटकेंच्या विजयाचे खरे शिल्पकार फडणवीस..अन्यथा शिवसैनिकांचे चेहरे लटकले असते...

Anderi Election : 'नोटा' (NOTA)ला तब्बल 12 हजार 776 इतकी विक्रमी मतं मिळाली आहेत.
Bjp leader Anil Bonde,  Uddhav thackere News
Bjp leader Anil Bonde, Uddhav thackere NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी (ता.६ नोव्हेंबर) लागला आहे. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत लटके यांनी 66 हजार 247 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि मतदारांना देत सहकारी पक्षांचेही आभार मानले. (Bjp leader Anil Bonde, Uddhav thackere News)

Bjp leader Anil Bonde,  Uddhav thackere News
आगरी समाजाच्या मतांसाठी आग्रह धरला तो आता का नाही?; भोईरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले...

दरम्यान, या निवडणुकीत विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकांची मते ही 'नोटा' (NOTA)ला मिळाली आहे. नोटाला या निवडणुकीत तब्बल 12 हजार 776 इतकी विक्रमी मतं मिळाली आहेत. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने त्यांचे उमेदवार मुरजी पटेलांना ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता. मात्र लटके यांच्या विजयानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून भाजपने माघार घेतल्यानेच लटके यांचा विजय झाला असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ऋतुजा लटके यांचं अभिनंदन. मात्र त्यांच्या या विजयाचे श्रेय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्याय हवे. याचे कारण म्हणजे आज विजयानंतर जे शिवसैनिक नाचतं असून पेढे वाटत आहेत ते फडणवीस यांच्यामुळेचं. भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांचा विजय झाला असून जर भाजपचा उमेदवाराने ही निवडणूक लढवली असती तर आज जे शिवसैनिक नाचत आहेत त्यांचे चेहरे आज लटकलेले राहले असते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला (ठाकरे गट) लगावला.

Bjp leader Anil Bonde,  Uddhav thackere News
पुणे पालिकेत मनसे-भाजपची युती होणार?; राज ठाकरेंचे शिलेदार खासदार बापटांच्या भेटीला...

दरम्यान, विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की, आज झालेला विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे,असे मी मानते. रमेश लटके यांनी हयात असताना जी जनसेवा केली, लोकांची कामे केली त्याचचं रूपांतर आजच्या विजयात झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. बोंडे (Anil Bonde) यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते हे बघावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com