Shivsena Dasara Melava फडणवीस म्हणाले, मी दोन्ही गटाची दसरा मेळाव्याची भाषणे ऐकणारं नाही...

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि आणि ठाकरे गटाचा वेगवेगळा दसरा मेळावा होत आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आपण शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याचं भाषण ऐकणार नाही. अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील काळा चौकी येथील मराठी दांडियाला फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि आणि ठाकरे गटाचा वेगवेगळा दसरा मेळावा होत आहे. यावर फडणवीसांना प्रसार माध्यांनी प्रश्न विचारले असता, ते म्हणाले की, मी दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं पाहणार नाही. त्यावेळी मी नागपुरामधील धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमाला जणार आहे. पण दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल." पण सध्याच्या परिस्थितीकडे कोणीही दुर्लक्षही करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Devendra Fadanvis
शिंदे गटाची नवी चाल? डमी उमेदवार देऊन करणार शिवसेनेची कोंडी!

याचवेळी त्यांनी नाव न घेता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे. '' सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे. भाषण हे खुसखुशीतही करता येतं. कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे व शिंदे गटाकडून गर्दी जमवण्याची जोरदार चढाओढ सुरु आहे. राज्यभरातून वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. लहान-मोठ्या अशा जवळपास दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहा हजार एसटी तसेच खासगी बसेस दसरा मेळाव्यासाठी बुक करण्यात आल्या आहे. शिवसेनेच्या इतिहासात यंदा प्रथमच दोन गटांचे स्वतंत्र दसरा मेळावे होणार आहेत. दोन्ही गटांनी गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला असल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com