Political News : उपमुख्यमंत्र्याचे बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बनावट ईमेलचा वापर करुन विद्युत विभागातील सहा अभियंत्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्याने गृह विभागाने परिपत्रक काढत बदली करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट ईमेलचा वापर केला जात असल्याची माहिती दिली. गृहविभागाचे हे परिपत्रक ट्विट करत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
गृहविभागाने उपमुख्यंत्र्यांच्या बनावट ईमेल आयडीद्वारे बदलीचे आदेश देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने जीआर काढून अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक केले आहे. पण, याआधी मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून ठग वावरत होते. आता ठग उपमुख्यमंत्र्यांचे खोटे ईमेल आयडी तयार करून फसवणुकीचे प्रकार करत आहे. हे सगळं राज्यातील मंत्रालयात सरकारच्या नाकाखाली होतं आहे, असा घणाघाती हल्ला विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारने जीआर काढून अधिकाऱ्यांना अधिकृत ईमेल वापरण्याची सक्ती तर केली. पण हे खोटे ईमेल कोणी तयार केले? ईमेल कोणी पाठवले? काय कारवाई झाली या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. अनेक प्रकरणाप्रमाणे या प्रकरणावर सुद्धा पडदा टाकण्याचे काम सरकार करत आहे का? या प्रकरणाची स्पष्टता आलीच पाहिजे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी थेट चौकशीची मागणी केली आहे.
गोळीबाराच्या प्रकरणानंतर राज्यसरकारला विरोधी पक्षांकडून घेरण्यात येत आहे. त्यात आता उपमुख्यमंत्र्यांचे बनावट ईमेल, लेटरहेडचा वापर करून बदलीचे आदेश काढण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विरोधी पक्षांना सरकारला घेरण्याची अजून एक संधी मिळाली आहे. कायदा सुव्यवस्था ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याची टीका विरोधीपक्ष करत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.