केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली असतानाच शिवसेनेने मोठा दावा केला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या दाव्याने महायुतीत समन्वय नसल्याचे उघड झाले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच या जागेवर उदय सामंत यांनी शिवसेनेचा दावा केला आहे.
नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्यसभेवर पाठवले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच त्यांना लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवावी लागणार. त्यासाठी राणेंची तयारी सुरू आहे. अशातच पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा (Shivsena) दावा केला आहे. त्यांनी लांजामध्ये हे विधान केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ही जागा कुणाला द्यायची हे महायुतीमधील नेते ठरवतील. त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. त्याचवेळी महायुतीमधील प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ही जागा कोणाला द्यायची याचे सर्व अधिकार महायुतीतील शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. भाजपनेही (BJP) त्यांच्या नेतृत्वाला तसे अधिकार दिले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ते ठरवतील. त्यामुळे शिवसेना म्हणून आमचा आजही या जागेवरती दावा आहे आणि आम्ही तशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे, असे मोठे विधान उदय सामंत यांनी केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपकडून रवींद्र चव्हाण, प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आता काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची भाजपची तयारी सुरू आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या दाव्यामुळे महायुतीत उमेदवार देण्यावरून असलेली धुसफूस समोर येत आहे. या शिवाय लोकसभेसाठी या मतदारसंघात लढत अधिक कडवी होईल, यात शंका नाही.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.