BMC Covid Scam: डॉक्टरांच्या खोट्या नोंदी, कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार; ईडी'च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

Covid Scam : या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे.
Bmc News
Bmc NewsSarkarnama
Published on
Updated on

BMC Covid Scam Update News : मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कोविड काळात दोनशेहून अधिक डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे तपासातून समोर आले आहे. सक्तवसूली संचलनालयाच्या (ED) सुत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या (BMC) जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. गेल्या दोन-तीन दिवसांत ईडी'च्या पथकाने मुंबईत अनेक ठिकाणी धाडीही टाकल्या. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही यात असल्याचे तापासात समोर आले. पण आता या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे.

Bmc News
Mumbai Bomb Blast Threat: मुंबई-पुण्यात बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर, तरुणाला अटक

कोरोना काळात दोनशेहून अधिक बोगस डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे. कंत्राटी डॉक्टरांच्या नावांच्या बोगस नोंदी करुन त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळण्यात आले आहेत. कोविड सेंट ला बहुतांश डॉक्टरांनी काही दिवस, तर काही डॉक्टरांनी काही आठवडे या कोविड सेंटरमध्ये सेवा दिली. (Maharashtra Politics)

पण डॉक्टरांनी कित्येक महिने सेवा दिल्याच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. यानंतर ईडीने (ED) ई-मेलद्वारे संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधत या प्रकरणात अशा डॉक्टरांना ईडी साक्षीदार करणार असल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत.

Bmc News
Patna 0pposition Meeting : पाटण्यात रंगलयं पोस्टर वॉर ; 'घराणेशाही' विरुद्ध 'मोहब्बत की दुकान'...

दरम्यान, मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना समन्स बजावले आहेत. डॉ.हेमंत रामशरण गुप्ता, राजू नंदकुमार साळुंखे, संजय मदनलाल शहा,सुजित मुकुंद पाटकर या भागीदारांना समन्स बजावण्यात आले असून २६ ते २८ जून या काळात ईडी'च्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती. त्यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला होता. ईडीने त्यांना गुरुवारी (२२जून) चौकशीसाठी बोलवलं होतं पण ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यांनी पु्न्हा हजर राहण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com