राऊतसाहेब हिशेब द्या; अन्यथा मी तुमचा हिशेब करेन : किरीट सोमय्यांचा निर्वाणीचा इशारा

आतली गोष्ट काय आहे, हे राज्यातील जनतेला एकदा कळू द्या.
Sanjay Raut & Kirit Somaiya
Sanjay Raut & Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काय-काय उद्योग करतात, हे आता जनतेपुढे यायला सुरुवात झाली आहे. ज्या प्रवीण राऊत यांनी पीएमसी बॅंकेतून १ हजार ९७ कोटी रुपये ढापले, त्या प्रवीण राऊत यांचे आपले संबंध काय आहेत. आतली गोष्ट काय आहे, हे राज्यातील जनतेला एकदा कळू द्या. तुमचे उद्योगधंदे लोकांना उद्यापर्यंत सांगा; अन्यथा मी सांगेल. हिसाब द्या; अन्यथा हिसाब होगा, असा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत यांना दिला आहे. (Kirit Somaiya's allegations against Sanjay Raut)

प्रवीण राऊत हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांना बुधवारी पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. याच प्रकरणात ईडीने राऊतांच्या दोन्ही मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकला आहे, त्याअनुषंगाने सोमय्यांनी राऊत यांना सवाल केला आहे.

Sanjay Raut & Kirit Somaiya
भाजपचा उमेदवार ठरला; कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम निवडणूक लढवणार!

सोमय्या यांनी सांगितले की ईडीकडून अटक करण्यात आलेल्या प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची भागीदारीमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. याच प्रवीण राऊत यांनी पीएमसी बॅंकेतून १ हजार ९७ कोटी रुपये ढापले आहेत. राऊतांच्या पत्नीने माधुरी राऊतसोबतच का भागीदारी केली? तुम्ही तर सांगता की आपली पत्नी शिक्षिका आहे. पण, आतली गोष्ट काय आहे, हे एकदा जनतेला कळू द्या, असेही सोमय्या म्हणाले.

Sanjay Raut & Kirit Somaiya
अनंत गीतेंनी घेतली बंडखोर शिवसेना नगरसेवकांची भेट : लवकरच भूमिका स्पष्ट करणार!

प्रवीण राऊत आणि कंपनी आपल्याला कशी मदत करते, हे लोकांना कळू द्या. आतली गोष्ट काय आहे? कोणा कोणाला काय काय मिळालं आहे. आपल्याला अलिबागची जागा मिळाली की दादरचा फ्लॅट मिळाला?, हेही एकदा सांगून टाका, असे आव्हान सोमय्या यांनी राऊतांना दिले.

Sanjay Raut & Kirit Somaiya
नगराध्यक्षपदाची चावी राष्ट्रवादीच्या हाती; शिवसेनेच्या सत्तेला थोरवे-लाड संघर्षाचे ग्रहण!

सुजीत पाटकर यांच्यावर ईडीकडून पडलेल्या छाप्यासंदर्भात बोलताना किरीट सोमय्या यांनी पुन्हा राऊतांवर निशाणा साधला. विदिता संजय राऊत, पूर्वशी संजय राऊत आणि सुजित मुकुंद पाटकर हे कोण आहेत? प्रवीण राऊत याने २०१० मध्ये आपली मदत केली होती. त्यातून आपण २०१० मध्ये अलिबागमधली जागा घेतली, त्यातले ५५ लाख रुपये ईडीला परत केले. सुजित पाटकर आणि राऊतांचा संबंध काय? असा सवालही सोमय्या यांनी संजय राऊतांना विचारला.

Sanjay Raut & Kirit Somaiya
भाजपच्या गडांची मोडतोड करता करता शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसलाही 'शॉक'!

संजय राऊत यांनी आपले उद्योगधंदे लोकांना उद्यापर्यंत सांगावे; अन्यथा मी सांगेल. तुमचे उद्योगधंदे आणि पैसे याबाबत हिशेब द्या, नाहीतर मी उद्या हिशेब करतो. चने, फुटाणे आणि ढोकळा वगैरे बोलून विषयांतर करु नका. राऊत परिवाराच्या उद्योगधंद्यांसंबधी शनिवारी (ता. ४ फेब्रुवारी) दुपारी ४ वाजता पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करणार आहे, असेही सोमय्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com