Nitesh Rane : संविधानासाठी लढले की शरिया लागू करण्यासाठी...? नितेश राणेंची ठाकरे गटावर सडकून टीका

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाआधी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्मारक बांधा अशी मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको."
Nitesh Rane, Uddhav Thackeray
Nitesh Rane, Uddhav ThackeraySarkarnama

Nitesh Rane On Thackeray Group: नितेश राणे यांनी शुक्रवारी (ता. 7 जून) रोजी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याचा आधार घेत त्यांनी टीका केली. राणे म्हणाले, "ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव म्हणतात की, मुस्लिम मतांमुळे निवडून आले. हे लोक संविधान वाचवण्यासाठी लढले की शरिया कायदा लागू करण्यासाठी लढले याचं उत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी द्यावं", अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे गटाला डिवचलं.

शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाआधी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्मारक बांधा अशी मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही राणेंनी लगावला. तसंच यावेळी बंधु निलेश राणे शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंतांचे बंधु किरण सामंत यांच्यावर केलेल्या आरोपावर भाष्य केलं.

ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधदुर्गमधील कार्यकर्त्यांच्या मनातील चीड आम्ही पोहोचवली आहे. ही भावना निलेश राणे, नितेश राणे आणि प्रमोद जठार यांची नव्हे तर ती आमच्या कार्यकर्त्यांची आहे, असं म्हणत त्यांनी निलेश राणेंच्या आरोपांचं समर्थन केलं.

आदित्य ठाकरे राज्यातील वायनाड मतदारसंघ शोधायला लागले

नितेश राणेंनी आदित्य ठाकरे हे राज्यातील आपला वायनाड मतदारसंघ शोधायला लागले असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, "आता आदित्य ठाकरे राज्यातील वायनाड मतदारसंघ शोधत आहेत. मुंब्रा, मानखुर्द आणि मुंबादेवी हे तीन मतदारसंघ ते शोधत आहेत. ते आता वरळीतून निवडणूक लढवणार नाहीत."

Nitesh Rane, Uddhav Thackeray
NCP Ajit Pawar : परफाॅर्मन्स कमी तरी, अजितदादांची ताकद वाढणार; कारण...

उदय सामंतांबद्दल तक्रार नाही

आमची उदय सामंत यांच्याबद्दल काहीही तक्रार नाही, ज्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे त्याच्याबद्दल आम्ही पुरावे दीले आहेत. भरत गोगावले यांच्याशी आम्ही योग्य वेळी बोलू, असं म्हणत त्यांनी गोगावले आणि सामंत यांच्याबद्दल तक्रार नसून केवळ किरण सामंत यांच्याबाबत नाराजी असल्याचं स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचा कणा

तर यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं करावं या मागणीबाबत राणेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचा कणा आहेत. त्यांची गरज आम्हाला सर्वांना आहे. देवेंद्र फडणवीस विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आज जे आहोत ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आहोत. त्यामुळे तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com