FIR Filed Mrunal Jadhav : भाजप शहराध्यक्षाच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल; कोठडीत रवानगी!

BJP Pratibha Jadhav Mrunal Jadhav Police : चित्रा वाघ म्हणाल्या की, बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजप महिला पदाधिकाऱ्या असलेल्या प्रतिभा जाधव यांच्या मुलीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधव ही प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. प्रतिभा हिनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती आहे.

या व्हिडिओमध्ये हिंदुत्ववादी संघटनेनेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बदलापूर पोलिस ठाण्यात मृणाल जाधव हिच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर, कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृणाल जाधव हिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिभा जाधव यांच्याकडे भाजपच्या बदलापूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी होती. या घटनेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मुलीच्या कृत्याबद्दल माफी मागत नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Pune Crime News
Akola Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; कारमधून बाहेर न आल्याने मोठा अनर्थ टळला

मुलीवर कारवाई झाली

आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करत सांगितले की,बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे.

अशा कृत्याला माफी नाही

प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही, असे देखील चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Pune Crime News
Ajit Pawar plane crash : अपघाताचा अहवाल येताच जय पवारांनी टाकला व्हिडीओ बॉम्ब; पायलटच्या सीटवर विमानाचे मालक अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com