Kolhapur Mahapalika News : 'दादा आयुक्त पाठवून द्या': आप'ने अजित पवारांना करून दिली आश्वासनाची आठवण

Kolhapur Commissioner : गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
Kolhapur Mahapalika News :
Kolhapur Mahapalika News :Sarkarnama

Kolhapur News : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते. पण अद्यापही कोल्हापुरला आयुक्त न मिळाल्याने आम आदमी पक्षाने आयुक्त मिळण्यासाठी पोस्टरच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत "दादा, मुंबईला पोचलासा काय? पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या" अशा आशयचे पोस्टरबाजी करून शहरातील छ. शिवाजी चौक, दसरा यासारख्या विविध चौकात लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Kolhapur Mahapalika News :
Nirmala Sitharaman Birthday : 'सेल्सवुमन' ते भारताच्या अर्थमंत्री ; निर्मला सीतारामन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, त्यांचा राजकीय प्रवास

गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे.

"शासन आपल्या दारी, पण आयुक्त नाही कोल्हापूरनगरी", "सरकार एका रात्रीत बनतंय, मग आयुक्त द्यायला 3 महिने का" असे पोस्टर झळकवत महानगरपालिकेला आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले.

Kolhapur Mahapalika News :
MU Senate Election : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी टळली; अमित ठाकरे यांचे लॉन्चिंग लांबणीवर

गेल्या आठवड्यातही आम आदमी पार्टीच्या वतीने कोल्हापूरला आयुक्त मिळावा यासाठी अंबाबाईला साकडे घालून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूरला पूर्णवेळ उपम आता या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच आयुक्तपद चर्चेत आलं आहे. आयुक्त नसल्याने कोल्हापुरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. प्रशासन प्रमुखच नसल्याने जिल्ह्यातील विकासकामांनाही खोडा लागला आहे, सर्वकाही अस्ताव्यस्त झाले असल्याची खंत आम आदमी पक्षाने केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com