Pratap Dighavkar Joins BJP : '२६/११'चे तपास अधिकारी आता भाजपमध्ये पदाधिकारी; प्रताप दिघावकरांचा पक्षप्रवेश

Pratap Dighavkar News : सर्जीकल स्ट्राईकमुळे जगात भारताची प्रतिमा उंचावल्याचे दिघावकरांनी सांगितले
Chandrashekhar Bawankule, Pratap Dighawkar
Chandrashekhar Bawankule, Pratap DighawkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या तापस करणारे माजी 'आयपीएस' अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थतीत मुंबईतील भाजप कार्यालयात दिघावकरांनी पक्षप्रवेश केला आहे. यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांनी निवृत्त होताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याता आता दिघावकरांचीही भर पडली आहे. दिघावकरांचे धुळे जिल्ह्यात मोठे प्रस्थ असून त्यांना तेथून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहेत. (Latest Political News)

Chandrashekhar Bawankule, Pratap Dighawkar
Swabhimani Shetkari Sanghatana : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता 'स्वाभिमानी'तही फूट पडणार?; तुपकरांच्या हाती बंडाचे निशाण

दिघावकरांनी ३५ वर्षे पोलीत दलात सेवा दिलेली आहे. २६-११च्या दहशतवादी हल्ल्यातील तपास पथकात त्यांचा सहभाग होता मोदींच्या नेतृत्वात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे जगात भारताची प्रतिमा उंचालवल्याचे दिघावकरांनी यावेळी स्पष्ट केले. आता राजकारणाच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवा करणार असल्याचे प्रताप दिघावकरांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत एका लग्नात जेवण केल्याच्या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला.

दिघावकर म्हणाले, "पुण्याचा 'एसपी' असताना एका लग्नाला जाण्याचा योग आला होता. त्यावेळी पत्नीसह जेवण करण्यास बसलो असता तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्यासोबत जेवण केले. त्यावेळी त्यांनी पुण्यात 'ऑटोमोबाईल' आणि 'सॉफ्टवेअर' क्षेत्र का वाढत आहे, याची माहिती विचारली. शैक्षणित क्रांती आणि समाजसुधारक यांच्याबाबत चर्चा झाली. छोट्यातील छोट्या गोष्टींमधून मोदी कायम शिकत असतात. त्याबाबत ते कुणाकडूनही माहिती घेतात, हे त्यांच्याकडून शिकलो."

Chandrashekhar Bawankule, Pratap Dighawkar
Mahavikas Aaghadi Meeting : 'मविआ'ची पुढची रणनीती ठरली ; 'वज्रमूठ' सभा पुन्हा 'युती' सरकारची धडधड वाढवणार

राज्यातही आता मोठ्या प्रमाणात विकासपर्व सुरू झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "मी रायगड 'एसपी' होतो. १९८८ मध्ये नवी मुंबई विमातळाचा बोर्ड पाहत होतो आणि नावात शिवडीलिंकचा बोर्ड होता. आज सांगायला अभिमान वाटतो की देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून डिसेंबरमध्ये नवीन शिवडीलिंक विमानतळ सुरू होईल. या गोष्टी मुंबईच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहेत. देशाचा वाढलेला जीडीपी, बळकट झालेली अर्थव्यवस्था आणि आज जगात पंतप्रधान मोदींनी देशाला मिळवून दिलेल्या प्रतिष्ठेमुळे मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com