Dagdu Sapkal Resign : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मतदान चार दिवसांवर असताना माजी आमदाराचा राजीनामा; मुंबईचे समीकरण बदलणार?

Uddhav Thackeray BMC Election : मुंबई महापालिका निवडणिकीच्यात मतदानाच्या चार दिवस आधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदाराने त्यांची साथ सोडत शिंदेंना साथ दिली आहे.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अवघ्या चार दिवसांत मतदान आहे. बुधवारी (ता.15) मतदान होईल आणि गुरुवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असताना मातोश्रीचे एकनिष्ठ म्हणून परिचित असलेले माजी आमदार दगडू सपकाळ यांनी राजीनामा दिला आहे.

दगडू सपकाळ हे मुंबईतील शिवडीचे माजी आमदार आहेत. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख पदाची देखील जबाबदारी होती. प्रभाग क्रमांक 203 मधून त्यांची मुलगी ही निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यास इच्छुक होती. मात्र, पक्षाने तिकीट नाकारल्याने सपकाळ नाराज होते.

आता आपण म्हातारे झालो असून पक्षाला आपली गरज नसल्याचे त्यांनी तीन दिवसांपूर्वी म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू होती.

Shivsena News
Badlapur News: टीकेनंतर भाजपला उपरती : बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचारातील आरोपी नगरसेवकाचा 24 तासांत घेतला राजीनामा

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळ 10 वाजता दगडू सपकाळ हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करतील. सपकाळ हे जुने शिवसैनिक असल्याने ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी साथ सोडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सपकाळांशी संपर्क साधला नाही...

दगडू सपकाळ म्हणाले की, पक्षाने मुलीला तिकीट नाकारले याचे वाईट वाटले नाही. मात्र, पक्षाने साधा संपर्क देखील आपल्याशी साधला नाही. आपण तिकीट नाकारत आहोत हे जरी त्यांनी सांगितले असते तरी चालले असते. मात्र, आपण आता म्हातारे झालो असून पक्षाला आपली गरज उरली नाही.

Shivsena News
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी सरकारचे सडेतोड उत्तर; 500 टक्के टॅरिफच्या प्रस्तावानंतर शड्डू ठोकला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com