Pune News : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश; पुढील दोन महिन्यात...

Pune Bhidewada News : 'स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे'
Bhidewada, Eknath shinde
Bhidewada, Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Pune Bhidewada News : पुणे शहरातील भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. तर भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यास सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच निकाली निघणार आहे.

Bhidewada, Eknath shinde
Bhidewada News : पुण्यातील भिडेवाड्याविषयी मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.

यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, छगन भुजबळ, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. छगन भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.

Bhidewada, Eknath shinde
Pimpri-Chinchwad : शास्ती कर रद्द होण्याची 'ही' आहे खरी अडचण

दरम्यान, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यास सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, असे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com