Sachin Waze Case Update: : सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला; अटकेबाबत हायकोर्टाने दिला निकाल

Sachin Waze plea rejected Antilia bomb scare case:सचिन वाझे सध्या कारागृहात आहे. सुटकेसाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे.
Sachin Waze plea rejected
Sachin Waze plea rejected Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची कारागृहातून सुटका करण्याची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली आहे. त्यामुळे वाझे याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

व्यापारी मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटके प्रकरणी सचिन वाझे सध्या कारागृहात आहे. सुटकेसाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

वाझे याला अटक केली तेव्हा, तो अधिकृत कर्तव्य बजावत नव्हता. त्यामुळे, त्याच्यावरील अटकेच्या कारवाईसाठी गृहविभागाच्या पूर्व मंजुरीची आवश्यकता नव्हती, अशी टिप्पणीही न्यायालयाने वाझे याची याचिका फेटाळताना केली आहे.निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची अटक मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवल्याप्रकरणी आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली तेव्हा बडतर्फ पोलिस अधिकारी वाझे त्याच्या अधिकृत क्षमतेनुसार काम करत नव्हता, असे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

'अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबद्दल मी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे,' असं म्हणत वाझेनं ( Sachin Waze ) एकच खळबळ उडवून दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com