Video Sanjay Pandey : माजी पोलिस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात!

Ex Mumbai Cp Sanjay Pandey will contest assembly elections : 'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार पांडे हे स्वतंत्र पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते आढावा देखील घेत आहेत.
Sanjay Pandey
Ex Mumbai CP Sanjay Pandeysarkarnama
Published on
Updated on

Sanjay Pandey News : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणारे मुंबईची माजी पोलिस आयुक्त विधानसभा निवडणूक लढणार आहेत. साम टिव्हीने या विषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पांडे हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या विनंती नंतर त्यांनी माघार घेतली होती.

'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार पांडे हे स्वतंत्र संघटना काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते आढावा देखील घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election वेळी अनेक नागरिकांनी आपल्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरल्याचे संजय पांडें यांनी आपल्या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. नागरिकांच्या आग्रहावर मी विचार करत होतो. रिटायरमेंट नंतर आलेल्या अडचणीत विषयी देखील पांडे बोलले आहेत. ते म्हणाले मी आयपीएस म्हणून रियाटर झालो. माझ्यावर केस असल्याने दिल्लीमधील केसमध्ये मला जामीन मिळायला अडचण येत होती. त्यामुळे सामान्य माणसांना किती अडचणी येत असतील. त्यामुळे सामान्य माणसांसाठी संघटना स्थापन करून त्यांना मदत करणार आहे.

Sanjay Pandey
Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला टोकाला जायला लावू नका", विशाल पाटील अन् कदमांना इशारा

कठीण काळात संभाळले आयुक्तपद

परमबीर सिंह हे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना फेब्रुवारी 2022 मध्ये मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याचे प्रकरण देशभर गाजत होते. त्यावेळी सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांची जागी संजय पांडे Sanjay Pandey यांच्याकडे मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त पद संभाळले.

Sanjay Pandey
Video Ganesh Naik : राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री; पण आमच्यासाठी फडणवीसच 'लीडर'! गणेश नाईक नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com