CBI Case : ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांचा सापळा, तब्बल 71 लाखांना गंडा; सत्य समोर येताच सगळेच हादरले! पत्नीमुळे मोठा डाव फसला

Dombivli Police CBI Crime News : डोंबिवलीमधील एका जणाला सीबीआय अधिकाऱ्याने 71 लाखांचा गंडा घातला. मात्र,तक्रारदाराच्या पत्नीमुळे खरा प्रकार उघडकीस झाल्याने सगळेच हादरले.
CBI
CBIsarkarnama
Published on
Updated on

Dombivli News : डोंबिवलीतील एका नोकरदाराला बनावट ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनी चौकशीची भीती दाखवत तब्बल 71 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, चौकशीची भीती दाखवणारे सीबीआय अधिकारी नव्हते त्यांच्या नावाने नोकरदाराला गंडा घातल्याचे समोर आल्याने सगळेच हादरले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

डोंबिवलीतील रहिवाशी महेश मनोहर आगरकर असे तक्रारदाराचे नाव असून ते एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून स्वतःला ‘टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी’ (ट्राय)चा अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईलवरून महिलांना गैरप्रकारचे संदेश पाठवण्यात आले असून याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती देत, या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर स्वतःला ‘सीबीआय’ अधिकारी म्हणून ओळख करून देणाऱ्या संदीप कुमार राव आणि करण शर्मा यांनी आगरकर यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या बँक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार आढळत असून तुम्हाला विविध बँकांकडून कमिशन मिळत असल्याचे भासवून त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. तसेच, प्रकरणातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत सर्वोच्च न्यायालयाच्या कथित आदेशांच्या नावाखाली मोठी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली.

CBI
Dombivli Crime News: ‘रील स्टार’ पुन्हा अटकेत; पोलिसांना सापडली धारदार शस्त्रे, डोंबिवलीमध्ये काय घडलं?

या बनावट अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार आगरकर यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 71 लाख 10 हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. ही रक्कम नंतर परत मिळेल, असेही त्यांना सांगण्यात आले होते.दरम्यान, घडत असलेल्या प्रकाराबाबत संशय आल्याने आगरकर यांनी ही माहिती पत्नीला दिली.

पत्नीमुळे मोठा डाव फसला

पत्नीने संबंधित व्यक्तींना विविध प्रश्न विचारल्यानंतर ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तसेच त्यांनी पाठविलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आगरकर यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे आरोपींचा मोठा डाव फसला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संदीप कुमार राव आणि करण शर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स, संदेश किंवा ‘अधिकारी’ म्हणून ओळख करून देणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

CBI
Kalyan Murder Case: रक्ताचे डाग, एक इंजिनीअरिंग स्टुडंट अन् हत्येचे अजब कारण! वाचा नेमकी कल्याणमधील मर्डर मिस्ट्री काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com