Maharashtra Politics: शंभूराज देसाईंच्या बैठकीकडे मंत्री चव्हाण, गायकवाड, भोईरांची दांडी

Kalyan-Dombivali News : इर्शाळवाडीत दुर्घटना जिल्ह्यात इतर कुठे होऊ नये यासाठी शंभूराज देसाईंनी पूरपरिस्थितीवर आढावा बैठक बोलवली होती.
Shambhauraj Desai
Shambhauraj Desai Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan- Dombivali News : इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलवलेल्या बैठकीला कल्याण-डोंबिवलीतील तीनही आमदारांनी पाठ फिरवल्यामुळे हे नाराजी नाट्य तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

इर्शाळवाडीत दुर्घटना जिल्ह्यात इतर कुठे होऊ नये यासाठी शंभूराज देसाईंनी पूरपरिस्थितीवर आढावा तसेच प्रशासकीय यंत्रणेचा आढावा बैठक बोलवली.पण कल्याण-डोंबिवलीचे तीनही आमदार या बैठकील अनुपस्थिती राहिल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी आहे की यामगे दुसरही काही कारण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Shambhauraj Desai
Sanjay Raut On Ajit Pawar: निधीवाटपातील गोंधळ महाराष्ट्राचे राजकारण नासवणारे; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

राज्यात बहुतांश ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना आपआपल्या जिल्ह्याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईनी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.ॉ

पण कल्याण डोंबिवलीतील तीनही आमदारांनी या बैठकीला पाठ फिरवल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे विश्वनाथ भोईर, कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड आणि डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र चव्हाण हे या बैठकीला गेलेच नाहीत. पण कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मात्र या बैठकीला उपस्थिती लावली होती.

Shambhauraj Desai
Rohit Pawar Protest: न्याय मिळत नाही, तोपर्यंत हलणार नाही ; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना इशारा

लोकप्रतिनिधींनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांपेक्षा राज्यातील राजकारणात जास्त रस असल्याची चर्चाही सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. मतदारांनी विश्वासाने या लोकप्रतिनिधींचा निवडून दिले असून त्यांच्या समस्या या वरिष्ठ पातळीवर मांडण्यासाठी यांची निवड केली आहे. मात्र या बैठकीला अनुपस्थिती लावत पालक मंत्र्यांपर्यंत कल्याण डोंबिवलीच्या समस्या पोहोचविल्या गेल्या नाहीत.

कल्याण डोंबिवलीकर सातत्याने आपल्या समस्यांविषयी आवाज उठवित असतात. परंतू त्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचू नये यासाठी हे प्रतिनिधीच पुढाकार घेत असल्याची चर्चा सुरु असून यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चिड निर्माण झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com