Gajanan Kirtikar News : शिंदे गटात ठिणगी ; कीर्तिकरांनी रामदास कदमांचं सगळंच काढलं...

Gajanan Kirtikar VS Ramdas Kadam News : गजानन कीर्तिकर यांचे अनेक गोप्यस्फोट
Gajanan Kirtikar, Ramdas Kadam News
Gajanan Kirtikar, Ramdas Kadam NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माझ्यावर गद्दारीचा संशय व्यक्त करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मालाड विधानसभा निवडणुकीत मला तसेच लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कदम यांनी कीर्तीकर यांच्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केल्याचे वृत्त शनिवारी प्रसिद्ध झाले आहे. त्याला खासदार कीर्तिकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कीर्तिकर हे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार असून ते सध्या शिंदे गटात आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आपणच शिवसेना पक्षातून लढवणार असून आपण साडेतीन लाख मताधिक्याने जिंकून येऊ असा ठाम विश्वास कीर्तिकर यांनी व्यक्त केला आहे.

Gajanan Kirtikar, Ramdas Kadam News
Uddhav Thackeray Mumbra Visit: 'पोलिसांनी बाजूला व्हावं, आम्ही यांना बघतो..'; ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा

रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मालाड मतदारसंघातून मला पाडवण्यासाठी त्यांनी भरपूर अयशस्वी प्रयत्न केले होते. नंतर खेड ते पुणे प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीत बसून रामदास कदम राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करीत होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठीही कदम यांनी भरपूर निष्फळ प्रयत्न केले होते, असा गोप्यस्फोट गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केला.

महापालिका निवडणुकीत कांदिवली पूर्व प्रभागातून त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेनेतून निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका, म्हणून रामदास कदम सर्व कार्यकर्त्यांना दमबाजी करत होते. हे सर्वाना ठाऊक असल्याचेही कीर्तिकर यांनी सांगितले.

सध्या रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे ते खोट्या बातम्या प्रसिद्ध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या दबावतंत्राला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थारा देणार नाहीत, अशी सर्व शिवसैनिकांना खात्री आहे.

त्याचमुळेच वैफल्यग्रस्त कदम आदळापट करीत आहेत. पक्ष नेतृत्वाच्या आणि जनतेच्या मनात मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांनी हे निष्फळ प्रयत्न थांबवावेत, असा इशाराही कीर्तिकर यांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिंदे गटातीलच दोन नेते भिडले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Gajanan Kirtikar, Ramdas Kadam News
CJI Dhananjaya Chandrachud : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडांच्या कारकिर्दीची वर्षपूर्ती; हे आहेत वैशिष्ट्यपूर्ण निकाल ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com