Ganesh Naik News : ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात वाद पेटला आहे. नाईकांनी जाहीर कार्यक्रमात नालायकांच्या हातात सत्ता देई नका, असे म्हणत नाव न घेता शिंदेंवर निशाणा साधला. त्यावर दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते नरेंद्र म्हस्के यांनी नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ संपूर्ण महारष्ट्रातील चित्रपटागृहात प्रदर्शित करु असा इशारा दिला होता. त्याला नाईकांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गणेश नाईक आव्हान देत म्हटले की, 'माझ्या गरजांइतके पैसे माझ्याकडे आहेत. मी अशी कोणतीही कामे करत नाही ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयची छाप पडेल. त्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर आताच करा, त्यास सामोरे जाण्यास तयार आहे.'
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते.
आजही मी शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. माझ्या आयुष्यात जर मी चुका केल्या असतील तर त्याचे पाप मी माझ्या खांद्यावर घेऊन जाईन, असेही ते म्हणाले. तसेच मी ९० साली आमदार झालो. आता २०२५ साल आहे, गेल्या ३५ वर्षांत असे किती लोक आले आणि गेले, त्यांची नावेही आठवत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
ठाणे पालिकेतील उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक होणे, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'आज न्यायाधीशांच्या घरातही पैसे सापडतात मग न्याय मागायचा कोणाकडे? हे लोकांचे दुर्दैव आहे. जर गणेश नाईक भ्रष्टाचारी असेल, तर माझ्यावरील प्रकरणे बाहेर काढा. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही. जो आपले कर्तव्य पार पाडत नाही तो नालायकच आहे, मी काम करत नसेन तर मी सुध्दा नालायकच ठरु शकतो.' असेही ते म्हणाले.
प्रशासन १० टक्के तर राजकारणात त्या पेक्षा काही टक्के अधिक नालायक लोक आहेत. शासकीय कर्मचारी म्हणजे कोणाचे नोकर नाहीत. काळाच्या ओघात पाप-पुण्याचे लक्तरं बाहेर येतात. कारण बऱ्याच गोष्टी जाणून-बुजून केल्या जातात. सिस्टीम बिघडली आहे आणि त्या बिघाडाला आम्ही सर्वजण काही अंशी जबाबदार असल्याचेही मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
.
माझ्याकडे दरबार भरविण्याची काही हौस नाही, पण लोकांना दिलासा देणारे काम या दरबारातून होत आहे. लोकांच्या तक्रारी येथे येतात, त्यामुळे अधिकारी कामे जलदगतीने काम करत आहेत. जर येथे कोणी येणारच नसेल तर असा दरबार बंद करायला मला अजिबात वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.