Municipal council reservation list : तुमच्या नगरपरिषद, नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद कुणासाठी राखीव? आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी एकाच क्लिकवर ...

Nagar Panchayat president reservation News : राज्यातील 247 नगरपरिषदा व राज्यभरातील 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Womens voting
Womens votingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. त्या निवडणुकीला आता मुहूर्त लागला आहे. दिवाळीनंतर स्थानिकच्या निवडणूकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. सोमवारी दुपारी मंत्रालयात राज्यातील 247 नगरपरिषदा व राज्यभरातील 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी राज्यातील 247 नगरपरिषदाच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यासोबतच राज्यातील 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

राज्यातील 247 नगरपरिषदापैकी 124 नगर परिषदेचे नगराध्यक्षपदावर महिलाराज असणार आहे. तर 33 नगरपरिषदामधील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. तर ओबीसी प्रवर्गासाठी 67 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 147 नगरपरिषदापैकी 74 महिलासाठी असणार आहेत तर उर्वरीत 73 नगरपरिषदा या पुरुषासाठी खुल्या असणार आहेत.

राज्यातील 147 नगरपंचायतींपैकी 74 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. तर 7 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असणार आहे.

Womens voting
Maharashtra municipal council elections : साकोली, गेवराई, संगमनेर ते रत्नागिरी : राज्यातील तब्बल 74 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद महिला 'ओपन' साठी राखीव

सोमवारी दुपारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

या नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव :

बोधनी रेल्वे, नीलडोह, गोंडपिंपरी, अहेरी, बेसापिंपळा, कोरची, ढाणकी, धानोरा, बहादूरा,

या नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव :

भिवापूर, अर्जुनी(मोरगाव), देवळा, समुद्रपूर, सिरोंचा, हिंगणा पाली.

Womens voting
Local Body Election Reservation : मोठी बातमी! नगराध्यक्ष आरक्षण जाहीर; बीड, शिर्डी, अकलूजसह 17 नगरपालिकांवर 'महिला राज', 'एससी'साठी राखीव!

नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायती :

पारनेर, तळा, घनसावगी, भामरागड, मंचर, पाटोदा, खानापूर (सांगली), पोंभुर्णा, म्हाडा, माहूर, वढवणी, पोलादपूर, आटपाडी, खालापूर, मालेगाव जहांगीर, शिरूर अनंतपाळ, पालम, कळवण, मंठा, सावली, कोंढाळी, मनोरा, मारेगाव, माळशिरस, आष्टी, एटापल्ली, झारी, जामणी, तलासरी, जाफ्राबाद, चाकूर, तीर्थपुरी, कणकवली, शिरूर कासार, आष्टी (बीड), विक्रमगड, अकोले, जिवती, मोखाडा, कर्जत (रायगड), सुरगाणा.

ओबीसी महिलासाठी राखीव असलेल्या नगरपंचायती :

पोलादपूर, तलासरी, आष्टी (बीड), वडवणी, कळवण,घनसावंगी, सावली, कर्जत-अहिल्यानगर, माळेगाव, पाटोदा, खालापूर, मंचर, भामरागड, शिरूर अनंतपाळ, माढा, आष्टी (वर्धा), जाफराबाद, चाकूर, मानोरा, जीवनी.

Womens voting
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेचं बिगुल वाजलं! 'इतक्या' टप्प्यात मतदान, 'या' दिवशी निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

खुल्या वर्गातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित नगरपंचायती :

मोहडी, बार्शी टाकळी, वाशी, म्हाळुंगा श्रीपूर, नांदगाव खंडेश्वर, गुहागर, राळेगाव, लाखांदूर, वैराग, सोयगाव, महादूला, अनगर, कडेगाव, पेठ, पाठण, औंढा नागनाथ, लाखनी, रेणापूर, नातेपुते, म्हसळा, सडक अर्जुनी, दिंडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, सिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवनी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताईनगर, बाभुळगाव.

खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठीच्या नगरपंचायती :

मुरबाड, अर्धापूर, म्हसळा, धडगाव, बोदवड, लाखांदूर, लाहोरा बुध्दरूख, मेढा, पेठ, मोताळा कडेगाव, कवठे महांकाळ, कसाई दोडामार्ग, बार्शीटाकळी, मुलचेरा, अनगर, महादुला, कुही, पारशिवनी, लाखनी, मोहाडी, सडक अर्जुनी, सालेकसा, नांदगाव खंडेश्वर, राळेगाव, बाभूळगाव, फुलंब्री, सोयगाव, ओंढा नागनाथ, केज, हिमायतनगर, वाशी, देवणी, रेणापूर, जळकोट, दिंडोरी, शिंदखेडा, साखरी, मुक्ताईनगर, सेंदुरनी, वाडा, शहापूर, देवरुख, लांजा, गुहाघर, देहू, पाटण, खंडाळा, लोणंद, महाळुंग, शिरपूर आजरा, हातकणंगले

Womens voting
Bihar Assembly Election : निवडणूक जाहीर होताच आला पहिला ओपिनियन पोल; राहुल-तेजस्वी जोडी ठरणार घातक?

राज्यातील २४७ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे :

अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असलेल्या नगरपालिका :

देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा,ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैंदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ.

अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी या नगरपरिषदांचे अध्यक्षपद राखीव :

भडगाव (जळगाव), वणी, पिंपळनेर (धुळे), उमरी (नांदेड), यवतमाळ, शेंदूरजनघाट.

अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी नगरपरिषदांचे अध्यक्षपद राखीव :

पाचगणी, फुरसुंगी देवाची, हुपरी, शेगाव, लोणावळा, बुटीबोरी, आरमोरी, मलकापूर (जिल्हा सातारा) नागभीड, चांदवड, कळमेश्वर, आर्मी, सेलू.

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील पुरुषासाठी नगरपरिषदांचे अध्यक्षपद राखीव :

पिंपळगाव, बसवंत, वरुड, राहुरी, एरंडोल, अमळनेर.

Womens voting
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेचं बिगुल वाजलं! 'इतक्या' टप्प्यात मतदान, 'या' दिवशी निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

ओबीसी महिलासाठी आरक्षित असलेल्या नगरपरिषदा :

भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौड, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर- नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुर्डूवाडी, धामणगावरेल्वे, वरोरा.

ओबीसी पुरुषासाठीसाठी आरक्षित असलेल्या नगरपरिषदा :

तिरोडा, वाशिम, भद्रावती, परंडा, नंदुरबार, खापा, शहादा, नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, मंगरूळपीर, कनान पिंपरी, पाथर्डी, रामटेक, नशिराबाद, पालघर, मूल, वरणगाव, इस्लामपूर, तुमसर, महाड, राहता, श्रीवर्धन, ब्रह्मपुरी, दर्यापूर, वैजापूर, गोंदिया, सांगोला, वर्धा, येवला, शिरपूर, वरवाडे.

Womens voting
Bihar Assembly Election : निवडणूक जाहीर होताच आला पहिला ओपिनियन पोल; राहुल-तेजस्वी जोडी ठरणार घातक?

खुला प्रवर्ग महिलासाठी राखीव नगरपरिषदा :

परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर- कोल्हापूर, मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदूरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनूरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगुड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलुस, यावल,सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदीरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग.

खुला प्रवर्ग पुरुषासाठी नगरपरिषदा :

फलटण, अहमदपूर, पात्री, चाळीसगाव, तळोदा, वाई, नांदगाव, जयसिंगपूर, निलंगा, लोहा, खोपोली, राजगुरुनगर, कराड, जेजुरी, उमरगा, आळंदी, पुसद, बारामती, जत, पारोळा, तळेगाव दाभाडे, सासवड, गडचांदूर, रिसोड, परतुर, किल्ले धारूर, चिखली, मेहकर, दारवा, सिल्लोड, सिन्नर, देवळी, मुरूम, वडगाव, महाबळेश्वर, आष्टा, दुधनी, कुंडलवाडी, खुलताबाद, नरखेड, राजुरा, सिंदखेड राजा, वाडी, डहाणू, देवळाली, प्रवरा, कामठी, अक्कलकोट, सातारा, भोर, इंदापूर, चिपळूण, माथेरान, श्रीगोंदा, श्रीरामपूर, मनमाड, नळदुर्ग, भोकर, बिलोली, आंबेजोगाई, जिंतूर, सोनपेठ, गंगापूर, पंढरपूर, पांढरकवडा, घाटंजी, मूर्तीजापूर, चिखलदरा आणि तुळजापूर.

Womens voting
Bihar Assembly Election : बिहारमध्ये कधी होणार निवडणूक, कोणते बदल? ज्ञानेश कुमार यांनी दिली महत्वपूर्ण माहिती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com