Ganesh Naik Vs Eknath Shinde: एकनाथ शिंदे-गणेश नाईकांच्या वादात 14 गावांचा हाल, आता थेट निवडणुकीनंतर...; वनमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

Navi Mumbai Corporation 14 Villages : त्री गणेश नाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे ही 14 गावे बाहेर काढा.
Eknath Shinde Vs Ganesh Naik
Eknath Shinde Vs Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik News : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ करण्यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतुरा सुरु आहे. त्यातच ही गावे स्थानिक स्वराज्य निवडणुकी पुरतीच नवी मुंबईत राहतील. निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच सहा महिन्यात ही गावे बाहेर काढली जातील, असा गोप्यस्फोट वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा 14 गावांचा नवी मुंबईतील समावेशाचा मुद्दा एरणीवर आला आहे. या गावांचे भवितव्य नक्की काय अशी चर्चा रंगली आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नवी मुंबईतून वगळलेली 14 गावे पुन्हा नवी मुंबईत घेण्यात यावी यासाठी 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती प्रयत्न करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात तसा अध्यादेश देखील निघाला. मात्र अद्याप गावांचे दप्तर जमा झालेले नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी गावांच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळावा अन्यथा ही गावे पालिकेत समाविष्ट केली जाऊ नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या गावांचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे.

14 गावांच्या समावेशावरुन शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच ही गावे महापालिका निवडणुकांपर्यत नवी मुंबई महापालिका हद्दीत राहतील. यानंतर ही गावे वगळली जातील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका हद्दीत प्रभाग रचनेसंबंधीचा कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणांना देऊ केला आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे ही गावे महापालिका हद्दीतच राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde Vs Ganesh Naik
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

तर याचं 14 गावावरून वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया आली आहे. मंत्री गणेश नाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे ही 14 गावे बाहेर काढा. नियमाप्रमाणे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ती गावे आता काढता नाही येणार. परंतु निवडणूक झाल्यानंतर ती गावे काढली जातील. माननीय मुख्यमंत्री बोलले की पहिल्याचं 6 महिन्यामध्ये ती गावे आपण काढू टाकू. शेवटी नवीमुंबईच्या जनेतच्या डोक्यावर 6 हजार कोटींचा भुर्दंड आम्ही पडू देणार नाही, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

कोणती आहेत 14 गावे...

दहिसर, पिंपरी, वालिवली, भंडार्ली, गोटेघर, मोकाशी, उत्तरशिव, नागांव, नावाळी, निघु, नारीवली, बामाली, वाकळण आणि बाळे या 14 गावांच्या नवी मुंबई महापालिकेतील समावेशामुळे राजकारण पेटले आहे.

Eknath Shinde Vs Ganesh Naik
Maha Vikas Aghadi future : ठाकरे बंधू भविष्यात एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार? उद्धव ठाकरेंनीच केले स्पष्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com