Shivsena News : गौतमीच्या Video मुळे नवा वाद? शिवसेनेत नवे प्रतोद मंगेश कुडाळकर?

Gautami Patil Video Viral : गोगावले यांच्याकडून प्रतोदपद काढून घेतले?
 mangesh kudalkar, gautami patil, bharat gogawle
mangesh kudalkar, gautami patil, bharat gogawle Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नुकताच दिला आहे. भरत गोगावले हेच शिवसेना पक्षाचे प्रतोद असल्याचे त्यांनी आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले. त्यानंतर शिवसेनेचे खरे प्रतोद कोण, या वादावर पडदा पडला. पण शिवसेनेने आपला प्रतोद बदलला का, असा प्रश्न विचारला जात आहे, त्याचे कारण म्हणजे कुर्ला फेस्टिव्हल.

सध्या कुर्ला फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये लावण्यात आलेले बॅनर अन् समाजमाध्यमांवर शेअर झालेल्या व्हिडिओमुळे शिवसेनेने आपले प्रतोद भरत गोगावले बदलले की काय? अशी शंका निर्माण होत आहे.

यात नृत्यांगना गौतमी पाटील हिने भर घातली आहे. कुर्ला फेस्टिव्हलमध्ये गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आहे. याबाबतचा व्हिडिओ तिने समाजमाध्यमांवर शेअर असून त्यात तिने आमदार मंगेश कुडाळकर यांचा उल्लेख शिवसेनेचे प्रतोद असा केला आहे. गौतमी या व्हिडीओची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कुर्ला फेस्टिव्हलमधील आपल्या कार्यक्रमाची माहिती देताना गौतमीने तिच्या व्हिडिओमध्ये शिवसेना प्रतोद, विभागप्रमुख, कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर असा उल्लेख केल्याने भरत गोगावले यांच्याकडून प्रतोदपद काढून घेतले का? असा प्रश्न काही जणांनी पडला आहे.

आपल्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील म्हणते...

नमस्कार, मी गौतमी पाटील. मी येतेय २८ जानेवारी रोजी नेहरुनगर, एसटी डेपो, शिवसृष्टी, कुर्ला (पूर्व) येथे सायंकाळी सात वाजता. कुर्ला फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला भेटायला. मला आमंत्रित केलंय शिवसेना प्रतोद, विभागप्रमुख, कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर यांनी… तर मी येतेय, तुम्ही नक्की या…

Edited by : Mangesh Mahale

R...

 mangesh kudalkar, gautami patil, bharat gogawle
Buldhana News : तुपकरांच्या कानाखाली आवाज काढावाच लागेल; शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com