Video RSS And BJP : नवे चेहरे आणि स्वच्छ प्रतिमा..., विधानसभेसाठी 'RSS'च्या भाजपला नेमक्या सूचना काय?

RSS And BJP Ready For Maharashtra Assembly Election : भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेत्यांना काही सूचना केल्या आहेत.
BJP Rss
BJP RssSarkarnama
Published on
Updated on

BJP And RSS : भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे उतरवा असा आग्रह 'आरएसएस'ने भाजपकडे केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

त्यामुळे आता संघ देखील निवडणुकीसाठी दक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे विधानसभेला सर्वांच्या विचाराने निवडणुका लढवण्याची भूमिका भाजपने घेतल्याचं दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी नागपूर (Nagpur) येथील संघ मुख्यालयाला भेटी दिल्या आहेत. अशातच आता संघाने विधानसभेसाठीच्या काही सूचना नेत्यांना केल्याची माहिती समोर आली आहे.

BJP Rss
Assembly Election : विधानसभेसाठी भाजपचं मिशन ठरलं? फिक्स 50 जागा तर उरलेल्या 'इतक्या' जागांसाठी लावली फिल्डिंग

त्या माहितीनुसार, सध्याचे दिग्गज आणि इतर नेत्यांना पूर्णवेळ प्रचारात उतरवा यासह स्वच्छ प्रतिमा असणार्‍या नेत्यांना प्रामुख्यानं संधी द्या, अशा सुचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) केल्या आहेत. त्यामुळे आता संघाच्या सुचनेनंतर भाजप कोणत्या नेत्यांना संधी देणार? आणि ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या नेत्यांसंदर्भात भाजपची भूमिका काय असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com