Raj Thackeray Uddhav Thackeray news : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाला आहेत. उल्हासनगर पुणे आणि दहिसर या भागांमध्ये गोळीबार झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. आणि यामुळे राज्यातील कायद्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राज्यात कायद्याविषयी शंका उपस्थित झाल्याने हे राज्य महाराष्ट्र पोलिसांच्या हाताचा दिल्यास काही तासात ते सगळ्या गुंडांना आळा घालतील, असं मत ठाकरे बंधूंनी व्यक्त केला आहे. Thackeray brothers united for this demand
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासोबत महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 24 तास द्या, हे राज्य ते साफ करतील आणि गुंडांना देखील साफ करतील अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत ते गुन्हेगारांना व्यवस्थित आळा घालतील असं मत uddhav thackeray "ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. Raj Thackeray Uddhav Thackeray
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एका मुलाखतीतील व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 48 तास द्या असा उल्लेख त्यांनी व्हिडिओत केला आहे. "आपल्या देशात कायदे आहेत, फक्त ऑर्डर नाही आहे. ऑर्डरची गरज आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांचा हातात 48 तास द्या आणि महाराष्ट्र साफ करायला सांगा. सगळ्या गोष्टी पोलिसांना ठाऊक असतात. फक्त ऑर्डर नसतात. रिस्क कोण घेईल. |
पोलिसांनी एखादी भूमिका स्वतःहून घेतली की त्यांना जेलमध्ये जावं लागेल. का जातील ते जेल मध्ये. बसलेला माणूस टेम्परारी आहे. त्यांच्यासाठी यांनी का कायमच जेलमध्ये जावं. फक्त त्यांना 48 तासांचा मोकळा हात द्या." अशी मुलाखत त्यांनी दिली होती. मनसैनिकांकडून (MNS) हा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल केला जात आहे. त्यामुळे पोलिसांसाठी आता ठाकरे बंधू एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे. Thackeray brothers united for this demand
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात सध्या विरोधक आक्रमक झाले आहेत. संजय राऊत हे दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका गुंडाचा फोटो ट्विट करत आहेत. त्यामुळे राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. मात्र या सगळ्यावर अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना केवळ टिवटीव करण्याची सवय झालेली आहे. बाकी ते काहीही करू शकत नाही. याविषयी ते बोलू शकणार नाही कारण की त्यांची यात मूळ चूक आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घातला.
Edited By : Rashmi Mane