Raj Thackeray: गुजराती व्यापाऱ्याला मारहाण व्हिडिओ; राज ठाकरेंच्या विरोधात पोलिस महासंचालकांकडे तक्रार

Raj Thackeray File Case Insults Hindi Language Inflammatory: मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली होती, याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मीरा भाईंदर येथे व्यापाऱ्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

✅ 3-पॉइंट सारांश:

  1. मीरा भाईंदर घटनेची पार्श्वभूमी
    मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे एका गुजराती व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज्यभर चर्चेला विषय ठरला.

  2. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
    'मराठीचा आवाज' कार्यक्रमात राज ठाकरे यांनी "मारहाण झाली तरी त्याचे व्हिडिओ काढू नका, आपल्यातच समजावून द्या" असे वक्तव्य करत संयम ठेवण्याचा सल्ला दिला.

  3. राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार
    त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वकीलांनी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली असून, राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमान्वये कारवाईची मागणी केली आहे.

मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या गुजराती व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना मीरा भाईंदरमध्ये काही दिवसापूर्वी घडली होती. तिचे पडसाद राज्यभर उमटले. मराठी-अमराठी असा वाद निर्माण झाला होता. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अशा मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करु नका, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना 'मराठीचा आवाज' कार्यक्रमात दिला होता.

हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रान उठवले होते. फडणवीस सरकारला त्यांनी धारेवर धरले होते. मोर्चांचा इशारा दिल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेत त्यासाठी एका समितीची घोषणा केली. यानंतर 'मराठीचा आवाज' कार्यक्रमात राज ठाकरे यांनी या व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्हिडिओबाबत भाष्य केले होते.

Raj Thackeray
Shaktipeeth Highway: खोटी बिले दाखवून आमदारानं लाटले ८६ लाख रुपये? आता 'शक्तिपीठ' मध्ये 'मलई' चाखणार...; राजू शेट्टींचा घणाघात

मारहाण करताना व्हिडिओ काढू नका, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. 'मराठीचा आवाज' या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच वरळी डोम येथे केले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावेळी 20 वर्षांनंतर प्रथम एकत्र आले .

मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली होती, याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मीरा भाईंदर येथे व्यापाऱ्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर या व्यापाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

काय म्हणाले होते राज ठाकरे

त्याच्या माथ्यावर लिहिलं होतं का गुजराती. इतर हिंदी आणि वेगळ्या चॅनलमध्ये गुजराती माणसाला मारलं. बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. गुजरात्याला मारलं का. किती व्यापारी आहे. ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे’ असे राज ठाकरे म्हणाले होते.

  1. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगणारा नसतो. मार खाणारा सांगतो मला मारलं. त्यांना सांगू देत. पण ऊठसूट कुणाला मारू नका.

  2. अनेक लोक आहेत. माझ्या परिचयाचे आहे. माझा मित्र आहे, नयन शाह. मी त्याला गुजराठी म्हणतो. तो अप्रितम मराठी बोलतो. पण विनोदाचं अंग आहे. शिवाजी पार्कात हेडफोन लावून पुलं देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं हे बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं.’

Raj Thackeray
Sangram Jagtap: अजितदादांच्या आमदारानं हाती घेतला ‘हिंदुत्वाचा भगवा’ ; भाजपवासी होणार?

कोणी केली तक्रार

वरळी डोम येथील ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड.पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी संयुक्तपणे पोलिस महासंचालकांकडे ही तक्रार केली आहे. सध्या महाराष्ट्रात परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम NSA अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील भाषणाबाबत राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रातून करण्यात केली आहे.

✅ चार प्रश्न एका ओळीत उत्तर

Q1: मीरा भाईंदरमध्ये काय घडले?
मराठी न बोलणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

Q2: राज ठाकरे यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी कार्यकर्त्यांना अशा मारहाणीचे व्हिडिओ न काढण्याचा सल्ला दिला.

Q3: या वक्तव्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली?
वकिलांच्या गटाने राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली.

Q4: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वर्षांनी एकत्र आले?
सुमारे 20 वर्षांनंतर वरळी कार्यक्रमात ते दोघे प्रथमच एकत्र आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com