Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSarkarnama

Gunaratna Sadavarte : संचालकपद गेल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंचे थेट ठाकरेंना चॅलेंज,'...तर मिशा ठेवणार नाही'

Aaditya Thackeray : 'उद्धव ठाकरेंच्या मागे एकही माणूस दिसणार नाही. वरळीच्या अंतर्गत खूप काम सुरू आहे. आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली आहे.', असे सदावर्ते म्हणाले.

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत आपली संघटना काम करत असून आपण अमरावतीमध्ये काम केले. संघटनेची लोकं काम करत आहे, असे सांगत गुणरत्न सदावर्तेंनी थेट आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिले आहे. येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही, सदावर्तेंनी Gunaratna Sadavarte म्हटले आहे.

Gunaratna Sadavarte
Sharad Pawar: शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीचं 'परफेक्ट टायमिंग; ऐन निवडणुकीत भाजपवर टाकला मोठा बॉम्ब

सदावर्ते म्हणाले, 'मी चॅलेंज देतो आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray डिपाॅझिट वाचवून दाखवावं. आयुष्यर मिशा ठेवणार नाही. वीर जिजामाता नगर, वरळीत येवून बघा, सदावर्तेच्या मागे किती लोकं आहेत ते कळेल. आदित्य येणारी निवडणूक लढवून दाखव. 25 टक्के मतमोजणीत तु रडतच घरी जाशील. तू बाळ आहेस.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray मागे एकही माणूस दिसणार नाही. वरळीच्या अंतर्गत खूप काम सुरू आहे. आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली आहे.', असे सदावर्ते म्हणाले. एसटी संचालकपद रद्द झाल्याच्या बातम्य खोट्या असल्याचा दावा देखील सदावर्तेंनी केला आहे.

संदीप शिंदेंवर टीका

सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आलं नव्हतं. तसेच इतर नियमांचे पालन करण्यात आले नसल्याची तक्रार सहकार आयुक्तांकडे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर सहकार खात्याने ही कारवाई केली आहे. त्यावरून संदीप शिंदे याच्यावर टीका करत आपले संचालकपद रद्द केले नसल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com